Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ! परशुराम उपरकर यांचे लोकांना आवाहन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्गवासियानी केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 15, 2024 | 08:32 PM
केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ! परशुराम उपरकर यांचे लोकांना आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

भगवान लोके/ सावंतवाडी: वेळागरवासीयांनी एकजूट दाखवत हुकूमशाहीला विरोध केला त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र एकीकडे महिलांचा सन्मान करण्याचा दिखाऊपणा करणारे राज्य सरकार व लोकांना हवा असेल तर प्रकल्प होईल असे म्हणणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्गवासियानी केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला

वेळागरवासीयांच्या या विषयाला 30 वर्षे झाली. गेली 30 वर्षे ते या विषयाची झगडत आहेत. मात्र कमिशन घेऊन आपली राजकीय तुमडी भरण्यासाठी लोकांच्या मागण्यांबाबत विचार न करता प्रकल्प लादला जात असेल तर ते चुकीचेच आहे. ३० वर्ष सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला अशा प्रकारे पोलीस बळाचा पर करून चिरडून टाकण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे. एकीकडे महिला सन्मानाच्या नावाने गळा काढणारे राज्य सरकार याच महिला, आया बहिणींवर लाठी चार्ज करतात त्यांची डोके फोडण्यापर्यंत यांची मजल जात असेल तर अशांना योग्य वेळी धडा शिकवण्याची गरज आहे.

लोकांच्या मागणीनुसार याबाबत निर्णय होणे अपेक्षित असतानाही पोलीस बळाचा वापर 

स्थानिक भूमिपुत्रांचा या प्रकल्पाला विरोध नाही तसा आमचाही विरोध नाही. मात्र तेथील भूमिपुत्रांच्या ज्या जमिनी वगळण्याची त्यांची मागणी आहे. त्याबाबत कार्यवाही व्हायला हवी. तेथील लोकांच्या मागणीनुसार याबाबत निर्णय होणे अपेक्षित असतानाही पोलीस बळाचा करण्यात आलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. जोर जबरदस्ती करून प्रकल्प लादला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने ठाम राहू असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी मतदारसंघातून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सलग तीनदा निवडून आले आहेत. आजच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून  दिपक केसरकर यांना लोकांनी पराभूत करावे हेच आवाहन  माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

Web Title: This is the time to banish tendencies like kesarkar appeal by parashuram uparkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar
  • Election
  • maharashtra
  • Sawantwadi

संबंधित बातम्या

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर
1

शेती सुधारणांची चुकलेली दिशा! सरकारी योजना का फसल्या? वाचा सविस्तर

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत
2

Siddhivinayak Temple Trust : पूरग्रस्तांच्या मदतीला धावला सिद्धिविनायकचा बाप्पा! ट्रस्टकडून “एवढ्या” कोटींची मदत

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके
3

आशियाई आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने भारताच्या नावावर केली चार पदके

Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट
4

Maharashtra Rain Alert : मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.