VBA leader Prakash Ambedkar on Nepal situation claims US donald trump interference
Nepal Crisis : छत्रपती संभाजीनगर : आपल्या शेजारील देशांमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमधील दिवाळखोरीनंतर आता नेपाळमध्ये हेच सुरु झाले आहे. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून अराजकता निर्माण झाली आहे. सोशल मीडिया विरोधात भूमिका घेत नेपाळमधील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे नेपाळमधील सरकार कोसळले असून मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेपाळमध्ये तरुणांनी आक्रमक पद्धतीने नेत्यांच्या विरोधात आवाज उठवला. सोशल मीडिया बंदी आणि इंटरनेट बंदीविरोधात GEN – Z तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनाला इतके हिंसक वळण लागले की पंतप्रधानांसह राष्ट्रपतींना राजीनामा देत देशातून पळावे लागले. नेपाळमध्ये एवढी हिंसा का झाली? फक्त सोशल मीडिया बंद करण्यात आला हेच एक कारण आहे की यात बाहेरच्या शक्तीचाही हात आहे? असे प्रश्न निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना या सर्व गोष्टींना अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. अमेरिका दक्षिण आशियात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी बांगलादेश आणि नेपाळमधील संकटांचा फायदा घेत असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळमधील परिस्थितीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी संशयाची सुई अमेरिकेकडे वळवली आहेत. ते म्हणाले की, भारताचा शेजारी देश – प्रथम बांगलादेश आणि आता नेपाळ – गंभीर अस्थिरता आणि राजकीय संकटांना तोंड देत आहे. दोन्ही देशांमध्ये निदर्शने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि लोकशाही क्षीणता यासारख्या वैध चिंतेतून उद्भवली असली तरी, व्यापक राजकीय संकटांना चालना देण्यासाठी या चळवळींचा वापर करण्यात अमेरिकेची भूमिका पूर्णपणे नाकारता येत नाही, असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
भारत का पड़ोस — पहले बांग्लादेश और अब नेपाल — गंभीर अस्थिरता और राजनीतिक संकट का सामना कर रहा है।
हालांकि दोनों देशों में विरोध प्रदर्शन भ्रष्टाचार, बेरोजगारी और लोकतांत्रिक क्षरण जैसी वैध चिंताओं से उत्पन्न हुए, लेकिन इन आंदोलनों का लाभ उठाकर व्यापक राजनीतिक संकट को हवा देने… https://t.co/oK4CVeAWip
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 10, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी लिहिले आहे की, भारतीय उपखंडातील राजकीय परिदृश्याला पुन्हा आकार देण्याचा एक संघटित प्रयत्न असल्याचे दिसून येते. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये चीनचा प्रभाव आधीच मर्यादित केला आहे आणि आता आपण भारत-समर्थक आणि चीन-समर्थक दोन्ही सरकारांचे पतन पाहत आहोत. बांगलादेशमध्ये, भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या शेख हसीनाच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारला पदच्युत करण्यात आले आहे. नेपाळमध्ये, जनरेशन झेडच्या नेतृत्वाखालील निदर्शनांमध्ये चीन-समर्थक पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला. या घडामोडी दर्शवितात की अमेरिका व्यापक भू-राजकीय रणनीतीचा भाग म्हणून दक्षिण आशियात प्रभाव स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दांत अमेरिकेच्या हालचालींवर संशय घेत प्रकाश आंबेडकर यांनी नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य केले.