
मुंबई – पिसे बंधाऱ्यावरील (Pise Dam) न्युमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे(Water supply repair work) येत्या १७ मे ते २१ मे दरम्यान मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
[read_also content=”लॉकडाऊनमध्येही धंदा करण्याचा उल्हासनगरचा नवा पॅटर्न – बाहेरून दुकानाला टाळा, आतमध्ये गिऱ्हाईकांची गर्दी https://www.navarashtra.com/latest-news/people-gathered-in-closed-shop-at-ulhasnagar-in-lockdown-nrsr-127382.html”]
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम सोमवारी १७ मे ते शुक्रवारी २१ मे पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.