सोलापूर : रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी आरे कॉलनी व नॅशनल पार्क येथे सह्याद्री देवराई उभारण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )यांना भेटणार असल्याची माहिती दिली.
माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळ्यासाठी अभिनेत सयाजी शिंदे आले होते. त्यावेळी सह्याद्री गेवराईच्या सततच्या नुकसानाबाबत सयाजी यांना विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की, प्रयत्न करणे सगळ्यांची जबाबदारी आहे ही एवढी मोठी जागा असताना कुणीतरी आग लावतो ही घटना निंदनीय आहे. त्यांना हात जोडून विनंती करतो की असं करू नका. यात सर्व मानव जातीचे नुकसान आहे. यासाठी शासनाने, ग्रामपंचायतीने, सामान्य माणसाने प्रयत्न करावे, असे कधी नुकसान होता कामा नये.
[read_also content=”कोल्हापुरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार : सतेज पाटील https://www.navarashtra.com/kolhapur/paschim-maharashtra/kolhapur/will-rehabilitate-of-slum-areas-of-kolhapur-nrka-239387.html”]
वृक्षारोपणाला पैशाची गरज लागत नाही तर इच्छेची गरज लागते. आरे कॉलनी व नॅशनल पार्कमध्ये देवराई उभी करायची आहे यासाठी या महिन्याभरात आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व किराणा दुकानात वाइन ठेवण्याबाबत बोलताना म्हणाले की जगात चांगल्या व वाईट गोष्टी असतात कोंबडीला सांगता येत नाही दगड खा किंवा माती खा.
[read_also content=”अखेर 3 दिवसानंतर जारमध्ये डोकं अडकलेल्या बिबट्याच्या पिलाची सुटका! https://www.navarashtra.com/thane/kokan/thane/finally-after-3-days-the-leopard-whos-its-head-stuck-in-the-jar-got-rescue-nrps-239365.html”]
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पालवन येथील सहयाद्री देवराईच्या डोंगराला रविवारी पहाटे आग लागली. यामध्ये हजारो झाडे जळाली होती.