Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांची Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Australia Social Media Ban : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात (Australia) १० डिसेंबरपासून २०२५ पासून १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर वापरावर बंदी लागू होणार आहे. मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी, तसेच मुलांचा सोशल मिडिया वापराचा अतिरेक टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मेटाने देखील ऑस्ट्रेलिया सरकारसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने सर्व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सला लहान मुलांचे अकाउंट सोशल मीडियावर हटवण्यासाठी आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मेटाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मेटा ऑस्ट्रेलियन सरकारचा नियम लागू होण्यापूर्वीच १६ वर्षाखालील सर्व मुलांचे सोशल मिडिया अकाऊंट्स ब्लॉक करणार आहे. मेटा ही इन्स्टाग्राम आणि फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील सर्व मुलांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट्स सोशल मीडियावरुन काढून टाकले जाणार आहेत. मेटाच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात सध्या ३,५०,००० इन्स्टाग्राम युजर्स आणि १,५०,०० फेसबुक युजर्स आहेत. हे सर्व १३ ते १५ वयोगटातील आहेत. मेटाने सांगितले आहे की, लवकरच सर्व युजर्सचे अकाऊंट लॉक केले जातील.
यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, देशातील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि विकासचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात २०२५ नंतर १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी असेल.
ऑस्ट्रेलियन सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सला १६ वर्षाखालील मुलांचे अकाउंट्स सिस्टममधून काढून टाकण्यास सांगितले आहेत. या नव्या कायद्यानुसार, कायदा लागू झाल्यानंतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला ही बंदी कशी लागू ठेवायची यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. असे न केल्यास कंपन्यांवर ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे देशातील तरुण आणि काही वकिलांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये पत्रकार, युवा वृत्तसेवा ६ न्यूज ऑस्ट्रेलियाचे संस्थापक १८ वर्षीय लिओ पुगलिसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, याचे काही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. या बंदीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची भीती ऑस्ट्रेलियात व्यक्त केली जात आहे. तसेच विरोधकांकडून या निर्णयावर तीव्र टीकाही केली जात आहे.
Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई
Ans: ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर १६ वर्षाखालील मुलांनासाठी सोशल मीडियावर बंदी लागू करण्यात आली. लहान मुलांना लागलेली सोशल मीडिया अतिवापराची सवय मोडण्यासाठी, मुलांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आहे.
Ans: ऑस्ट्रेलियात इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेड्स, टिकटॉक, स्नॅपचॅट, रेडिट, एक्स, यू-ट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरावर १६ वर्षाखालील मुलांना बंदी घालण्यात आली आहे.
Ans: ऑस्ट्रेलियात १० डिसेंबर २०२५ पासून १६ वर्षाखालील मुलांसाठी बंदी लागू होणार आहे.
Ans: मेटा ४ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियातील १६ वर्षाखालील मुलांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करणार आहे.






