चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल 12 अब्जांचा दंड, प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हिंसाचार, अत्याचार, बंधक बनवणे आणि राजकीय शत्रुत्वाच्या आरोपाखाली खामेनेईंना दोषी ठरवण्यात आले आहे. याअंतर्गत अमेरिकेच्या न्यायालयाने खामेनेईंवर तब्बल १२ अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र हा दंड अमेरिकेलाच भरावा लागणार आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेते यांच्या चुकांसाठी ट्रम्प प्रशासनाला ६ अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या राजकीय कैदी अकबर लाखिस्तानी यांनी खामेनेई यांच्याविरोधात एक खटला दाखल केला आहे.
अली खामेनेईंवर आरोप करण्यात आला आहे की, इराणमध्ये लाखिस्तानी लोकांना बेकायदेशीरपणे अटक केली जात आहे. त्यांना तुरुंगात ठेवले जात आहे. तसेच त्यांच्या सरकारच्या इशाऱ्यवर अत्याचार केले जात आहे. अली खामेनी यामध्ये मुख्य आरोपी असल्याचे या आरोपपत्रात दाखल करण्यात आले आहे.
याअंतर्गत न्यायलयाने इराण सरकारला नोटिस पाठवली आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे कोर्टाने त्यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर, दस्ताऐवजांवर आणि साक्षीदारांच्या आधारावर खामेनेई यांना दोषी ठरवले आहे.
याअंतर्गत न्यायालयाने इराणवर १२ अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र इराणकडून ही रक्कम वसूल करणे अशक्य आहे. यामुळे कोर्टाने अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाला अर्ध्या रकमेची भरपाईचे आदेश दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाने याला सहमती दिली आहे, परंतु यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अकबर लाखिस्ताने हे इराणच्या सैन्यात कार्यरत होते. पण इराण-इराक युद्धानंतर लाखिस्तानी अझरबैझानला गेले. तिथे त्यांनी अझरबैझानच्या राजकारणात सहभाग घेतला. त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळवला आणि ते अमेरिकेत गेले. यानंतर त्यांनी पुन्हा इराणमध्ये स्थलांतर केले. परंतु इराणने त्यांना दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपाखाली अटक केली. अकबर लाखिस्तानी यांनी आरोप केला आहे की, तुरुंगात त्यांच्यावर गंभीर अत्याचार झाला. यामुळे त्यांनी अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. यामध्ये खामेनेई यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
अमेरिका-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर; फटका मात्र भारताला बसणार? जाणून घ्या अंदर की बात…






