Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपमध्ये जायचे ठरताच ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा; नेमके कारण काय?

काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदारकी दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2024 | 07:34 PM
भाजपमध्ये जायचे ठरताच 'या' माजी मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा; 'झामुमो' सोडण्याचे कारण काय?

भाजपमध्ये जायचे ठरताच 'या' माजी मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा; 'झामुमो' सोडण्याचे कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आणखी एक मुख्यमंत्री भाजपच्या गटात सामील होणार आहेत. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंपाई सोरेन हे झारखंडावरून दिल्लीत दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी चंपाई सोरेन यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतली होती. यावेळेस आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे देखील उपस्थित होते.

आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड निवडणूक सह प्रभारी हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदारकी दिली आहे. चंपाई सोरेन यांच्या प्रवेशामुळे आणखी एक मुख्यमंत्री भाजपने आपल्या गळाला लावल्याचे बोलले जात आहे.

झारखंडचे तेव्हाचे आणि आताचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यावेळेस चंपाई सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र हेमंत सोरेन तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने चंपाई सोरेन नाराज झाले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

Former Chief Minister of Jharkhand and a distinguished Adivasi leader of our country, @ChampaiSoren Ji met Hon’ble Union Home Minister @AmitShah Ji a short while ago. He will officially join the @BJP4India on 30th August in Ranchi. pic.twitter.com/OOAhpgrvmu

— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 26, 2024

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशाबद्दल एक्स वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यामुळे सोरेन यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. तसेच रांचीमध्ये चंपाई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान चंपाई सोरेन यांची हेरगिरी केली जात असल्याचा आरोप हेमंत बिस्वा सरमा यांनी केला होता.

दरम्यान २५ ऑगस्ट रोजी सोरेन यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोरेन यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. झारखांमध्ये पोहोचताच त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार नाही. चंपाई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आहेत. झारखंडच्या कोल्हान भागात त्यांचे वर्चस्व आहे. कोल्हानच्या १४ विधानसभा जागांवर चंपाई सोरेन यांची चांगली पकड आहे. सोरेन भाजपमध्ये आल्याने भाजप या १४ जागांवर आपली पकड मजबूत करू शकणार आहे.

Web Title: Zarkhand ex cm champai soren join the bjp 30 august central government provide z plus security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 07:33 PM

Topics:  

  • BJP news
  • Champai Soren News

संबंधित बातम्या

Champai Soren house arrest : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन नजरकैदेत; बॅरिकेटची रांग अन् पोलिसांचा मोठा फौजफाटा
1

Champai Soren house arrest : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन नजरकैदेत; बॅरिकेटची रांग अन् पोलिसांचा मोठा फौजफाटा

PM नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार; भाजप नेत्यांचा अजब दावा, दाखवली राजकीय भक्ती
2

PM नरेंद्र मोदी हे विष्णुचे 11 वे अवतार; भाजप नेत्यांचा अजब दावा, दाखवली राजकीय भक्ती

Parbhani News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप अ‍ॅक्शनमोडवर
3

Parbhani News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप अ‍ॅक्शनमोडवर

Uddhav Thackeray News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाला आग…; उद्धव ठाकरेंनी भाजपच्या  पुन्हा डिवचलं
4

Uddhav Thackeray News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपच्या बुडाला आग…; उद्धव ठाकरेंनी भाजपच्या  पुन्हा डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.