Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, छातीतील वेदनांसह इतर अवयवांमध्ये दिसतात संकेत

हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या हार्ट अटॅकची गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2026 | 05:30 AM
हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, छातीतील वेदनांसह इतर अवयवांमध्ये दिसतात संकेत

हार्ट अटॅक येण्याच्या १ महिना आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, छातीतील वेदनांसह इतर अवयवांमध्ये दिसतात संकेत

Follow Us
Follow Us:

हार्ट अटॅकची लक्षणे?
हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे आणि खाऊ नये?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरुण वयातील मुलांमुलींपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. हृदयविकाराचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवसआधी शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष केले जात नाही. सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केलेली लक्षणे कालांतराने जीवघेणी ठरतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता आणि कामाचा वाढता तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीर कमकुवत होत जाते.(फोटो सौजन्य – istock)

साठीनंतर शरीर साथ देत नाही? मग रोजच्या जीवनात करा ‘हे’ छोटे बदल

हार्ट अटॅक येण्याचे प्रमुख कारण म्हणजे रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. ज्याच्या परिणामामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि आरोग्य बिघडते. हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसणारी लक्षणे.

हार्ट अटॅक येण्याची कारणे:

  • उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल
  • मधुमेह
  • लठ्ठपणा
  • धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन.
  • शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक तणाव
  • रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला प्लाक

हार्ट अटॅक येण्याच्या आधी दिसून येणारी लक्षणे:

बऱ्याच रुग्णांना हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित आजार होण्याच्या आधी शरीरात सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. छातीवर दाब येणे, घट्टपणा जाणवणे किंवा जळजळ होणे इत्यादी लक्षणे सामान्य वाटतात, पण असे नसून हार्ट अटॅक येण्याची गंभीर लक्षणे आहेत. तुमच्या शरीरात कोणत्याही कारणाशिवाय प्रचंड थकवा, अशक्तपणा किंवा धाप लागल्यासारखे जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. हृदय कमकुवत झाल्यानंतर पायऱ्या चढताना किंवा थोडे चालल्यावर लगेच दम लागतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर येते. कडाक्याच्या थंडीत सुद्धा तुम्हाला घाम येत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

कुटुंबाचा खंबीर आधार म्हणजे घरातील जेष्ठ मंडळी! अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरेल फायदेशीर

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय खावे आणि खाऊ नये:

दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी तळलेले आणि तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पॅकेज्ड स्नॅक्स, अति मीठ, लाल मांस, साखरयुक्त पेये आणि बेकरी उत्पादनांचा आहारात अजिबात समावेश करू नका. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सुकामेवा, बिया, ऑलिव्ह ऑइल इत्यादींचा आहारात समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: छातीत वेदना, सतत थकवा, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे, चक्कर येणे आणि हात, मान किंवा जबड्यात वेदना अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: हार्ट अटॅकपूर्वी छातीत कशाप्रकारची वेदना जाणवते?

    Ans: छातीत दडपण, जळजळ, जडपणा किंवा घट्ट पकडल्यासारखी वेदना जाणवू शकते. काही वेळा ही वेदना डाव्या हातापर्यंत पसरते.

  • Que: महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगळी असतात का?

    Ans: होय. महिलांमध्ये थकवा, मळमळ, अपचन, पाठदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे अधिक दिसू शकतात.

Web Title: 1 month before a heart attack these severe symptoms appear in the body including chest pain and symptoms in other organs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • heart attack
  • heart blockage
  • heart problems

संबंधित बातम्या

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
1

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’
2

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.