superfood
सध्या डेंग्यूचा कहर सगळीकडे माजला आहे. प्रचंड ऊन, बदलणारे तापमान यामुळे डेंग्यूच्या आजार सध्या पसरताना दिसतोय. केवळ उष्णतेची लाट आणि सूर्यप्रकाशच नाही तर डासही लोकांसाठी त्रासाचे कारण झालेले सध्या दिसून येत आहे. डेंग्यूसारख्या डासांमुळे होणा-या आजारांचा धोका खूपच वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथे वातावरणातील बदलामुळे डेंग्यू आणि डासांमुळे होणाऱ्या इतर आजारांच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. डेंग्यू हा एक सामान्य, परंतु गंभीर आजार आहे, जो दरवर्षी जगभरात कहर करतो.
अशा परिस्थितीत या आजारापासून स्वत:चा बचाव करणे महत्त्वाचे आहे आणि जर कोणाला हा आजार झाला असेल तर योग्य माहिती घेऊन वेळीच योग्य उपचार करायला हवेत. डेंग्यूमुळे रुग्णाच्या प्लेटलेटचे प्रमाण अनेकदा कमी होते. अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. चला जाणून घेऊया असे काही सुपरफूड जे आपल्या शरीरातील पेशी वाढविण्यास मदत करतात (फोटो सौजन्य – iStock)
विटामिन सी समृद्ध पदार्थ
संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची यांसारख्या विटामिन सी ने समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढते. त्यामुळे तुम्ही या दिवसांपासून या फळांचा आणि भाज्यांच आपल्या आहारातमध्ये समावेश करून घ्यावा.
विटामिन के
रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट्सच्या सुरळीत कार्यासाठी, विटामिन के युक्त समृद्ध आहार घ्यावा. यासाठी तुम्ही केल, पालक, हिरव्यागार भाज्या, ब्रोकोली, कडधान्ये, शतावरी यासारखे पदार्थ खाऊ शकता, ज्यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन के चा भरणा आहे.
[read_also content=”वजन कमी करण्यासाठी लाल कोबी https://www.navarashtra.com/gallery/healthy-benefits-of-red-cabbage-546212/”]
फोलेटयुक्त पदार्थ
विटामिन बी 9 किंवा फोलेटने समृद्ध असणारे पदार्थदेखील प्लेटलेट संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यासाठी मसूर, फसरबी, एवोकॅडो, धान्य यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
[read_also content=”सकाळची सुरूवात करा या पेयाने https://www.navarashtra.com/lifestyle/health-benefits-of-aloe-vera-juice-545049/”]
भिजवलेले मनुके वा बेदाणे
भिजवलेले मनुके वा बेदाणे तुम्ही नियमित खावे. यामुळे कमी झालेले प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खूप मदत मिळते. मनुका अथवा बेदाण्यांमध्ये असलेले लोह पेशी वाढविण्यास मदत करते आणि तुम्हाला डेंग्यूसारख्या आजारातून लवकर बरे करण्यासाठी फायदा मिळतो.
ताजे किवी
किवी या फळामध्ये पोटॅशियम आणि विटामिन सी चे प्रमाण अधिक आढळते. डेंग्यूमुळे तुमच्या प्लेटलेटची संख्या कमी झाली असेल तर ती वाढवण्यासाठीदेखील किवी हे फळ खूप प्रभावी म्हणून ओळखले जाते.
बीट
अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेले बीटरूट आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवून देते. हे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून प्लेटलेट्सचे संरक्षण करते, ज्यामुळे प्लेटलेटची संख्या वाढते. आपल्या आहारात उकडलेले बीट, बीटची कोशिंबीर, बीटचे रायते याचा समावेश करून घ्यावा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नियमित सकाळी बीटची स्मूदीदेखील पिऊ शकता.
डाळिंबाचे दाणे
लालचुटूक डाळिंब हे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. अँटीऑक्सिडंट आणि लोहाने समृद्ध असणारे डाळिंब हे कमी झालेले प्लेटलेट्स पुन्हा वाढवण्यासदेखील मदत करू शकते. आठवड्यातून किमान २-३ वेळा डाळिंबाचे दाणे तुम्ही खावेत.
दही
दही हा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. दही केवळ प्लेटलेट काऊंट वाढवत नाही तर हाडे मजबूत करण्यासदेखील मदत करते. हे खाल्ल्याने बोन मॅरोची प्लेटलेट निर्मिती क्षमता वाढते. तसंच डेंग्यूच्या आजारादरम्यान तुम्ही दही खाल्ल्याने लवकर बरे होण्यास मदत मिळते.
आवळा
अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन सी समृद्ध असणाऱ्या आवळ्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स तयार करण्याच्या प्रक्रियेत आवळा मदत करतो. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचा मुरंबा, नुसता आवळा अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता.
पपईचे पान
पपईप्रमाणे पपईचे पानदेखील तितकेच गुणाचे मानले जाते. पपईच्या पानात असलेले एसिटोजेनिन हे एक प्रकारचे फायटो केमिकल आहे, जे प्लेटलेट काऊंट वाढवण्यासाठी प्रभावी मानले जाते. त्यामुळे तुम्हाला डेंग्यूदरम्यान पांढऱ्या रक्तपेशी वाढवायच्या असतील तर याचा उपयोग करून घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
संदर्भ
https://www.medicalnewstoday.com/articles/322937
https://pharmeasy.in/blog/how-to-increase-platelet-count-naturally/
https://www.ironwoodcrc.com/boost-your-platelets-with-nutrition/