नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा अनेक पटींनी घातक असतो Silent Heart Attack; न समजताच मृत्यू देतो भेट, आजच जाणून घ्या लक्षणे
हार्ट अटॅकचा धोका दिवसेंदिवस वाढतंच चालला असून आतापर्यंत अनेक लोकांनी यामुळे आपला जीव गमावला आहे पण तुम्हाला माहिती आहे का? याहून कितीतरी पटींनी अधिक घातक आणि जीवघेणा असतो तो म्हणजे सायलंट हार्ट अटॅक. हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे यात जाणवत नाहीत किंवा ती सौम्य असतात आणि ती लोकांना हृदयविकाराशी जोडता येत नाहीत. या स्थितीत हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे हृदयाच्या ऊतींना नुकसान पोहोचते.
सामान्य हृदयविकाराबद्दल सगळेच बोलतात, पण अनेकांना सायलंट हार्ट अटॅकविषयी फारशी माहिती नाही आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत. जेव्हा सायलेंट हार्ट अटॅक येतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याचा अंदाजही येत नाही. त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन असेही म्हणतात. चला तर मग याची लक्षणे, कारणे अशी सर्वच माहिती जाणून घेऊया.
सायलंट हार्ट अटॅक म्हणजे काय?
सामान्य हृदयविकाराच्या झटक्यात दिसून येणारी कोणतीही लक्षणे सायलेंट हार्ट अटॅकमध्ये दिसून येत नाही. कधीकधी त्याची लक्षणे सौम्य असतात किंवा इतकी असतात की लोक त्याचा संबंध हृदयविकाराच्या झटक्याशी जोडत नाहीत. म्हणूनच ते ओळखणे कठीण होते. परंतु सामान्य हार्ट अटॅक इतकेच सायलंट हार्ट अटॅक देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याचा परिणाम असा होतो की बराच काळ लोकांना हे समजतच नाही की त्यांना सायलंट हार्ट अटॅक आला आहे आणि अनेक आठवड्यांच्या चाचण्यांमध्ये ते कळून येत. अशात वेळ झाला तर व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका असतो.
जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन आपल्या हृदयापर्यंत नीट पोहचत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे कोरोनरी धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे होते. काही प्रकरणांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये उबळ किंवा दुखापत झाल्यामुळे देखील रक्त प्रवाह थांबू शकतो.हृदयविकाराचा झटका हा दिवसा किंवा रात्री झोपेत कधीही येऊ शकतो. जेव्हा तुम्ही अचानक खूप ताणतणावात असता किंवा जास्त व्यायाम करत असता तेव्हा देखील हे होऊ शकते.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
सहसा, हृदयविकाराच्या झटक्याने छातीत तीव्र वेदना होतात, जी विश्रांती घेतल्यानंतर किंवा औषध घेतल्यानंतरही थांबत नाहीत. परंतु सायलंट हार्ट अटॅकमध्ये, लक्षणे सौम्य असतात किंवा अजिबात उद्भवत नाहीत. यामुळे, लोकांना समजत नाही की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याची लक्षणे कधीकधी अशी दिसून येऊ शकतात –
सामान्य हृदयविकाराची लक्षणे
सायलेंट हार्ट अटॅक का येतो?
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलचा थर म्हणजेच प्लेक जमा होतो, ज्यामुळे रक्तमार्ग जाड होतो. जर त्यावर रक्ताची गुठळी तयार झाली तर रक्ताभिसरण पूर्णपणे थांबते. जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर हृदयाच्या स्नायूंनाही नुकसान होऊ शकते.
Lip Care Tips: ओठ कायमच कोरडे आणि निस्तेज दिसतात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा गुलाबी ओठ
कोणत्या लोकांना जास्त धोका आहे?
लट्ठपणा, व्यायाम न करणे, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लडप्रेशर अशा आरोग्य समस्या असणाऱ्या लोकांना याचा धोका जास्त आहे आणि यासहच जे लोक आपल्या आहारात मिठाचा, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा वापर जास्त करतात, ज्यांना धूम्रपान करण्याची सवय आहे अशा लोकांना याचा धोका जास्त आहे.
हार्ट अटॅकचे रिस्क फॅक्टर काय आहेत?
कुटुंबात हार्ट डिसीजची हिस्ट्री असणे, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष, ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला, मेनोपॉजच्या नंतरच्या महिला.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.