Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या या 5 चुका टाळल्या नाहीत तर निश्चितच तुम्हालाही होईल Blood Cancer, शास्त्रज्ञांचा इशारा…कधीही बाहेर येऊ शकतं रक्त

मागील काही काळापासून ब्लड कॅन्सरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, याचे मूळ कारण आपल्या रोजच्या जीवनातील काही वाईट सवयी आहेत. यांना वेळीच न रोखल्यास तुम्ही ब्लड कॅन्सरला बळी पडू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2025 | 08:15 PM
रोजच्या या 5 चुका टाळल्या नाहीत तर निश्चितच तुम्हालाही होईल Blood Cancer, शास्त्रज्ञांचा इशारा...कधीही बाहेर येऊ शकतं रक्त

रोजच्या या 5 चुका टाळल्या नाहीत तर निश्चितच तुम्हालाही होईल Blood Cancer, शास्त्रज्ञांचा इशारा...कधीही बाहेर येऊ शकतं रक्त

Follow Us
Close
Follow Us:

कर्करोग हा भयानक आजार आहे ज्यात व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. पूर्वी क्वचित आढळून येणार हा आजार आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच सामान्य झाला आहे. कर्करोग अनेक प्रकारचा असू शकतो ज्यात रक्त कर्करोग म्हणजेच ब्लड कॅन्सरचा समावेश आहे. यात म्हणजे शरीरातील रक्त पेशींचे असंतुलन होऊन असामान्य पेशींची वाढ होते आणि त्या सामान्य रक्त पेशींच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतात. हा अस्थिमज्जामध्ये (बोन मॅरो) सुरू होतो, जिथे रक्त तयार होते. रक्ताचा कर्करोग हा ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारख्या विविध प्रकारांमध्ये येतो.

तोंडात वाढलेल्या जखमा- अल्सर एका रात्रीत बरे! ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी १२ ची कमतरता होईल दूर

कर्करोग केंद्राच्या मते, सर्व प्रकारचे ब्लड कॅन्सर डीएनएमधील गोंधळ किंवा उत्परिवर्तनांमुळे होतात. हे बदल का होतात याचे नेमके कारण माहित नाही. असे म्हणता येईल की मानवांचे त्यावर नियंत्रण नाही. लक्षात ठेवा की रक्त कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या रक्त कर्करोगासाठी हे जोखीम घटक वेगवेगळे असू शकतात. तथापि संशोधनात काही जोखीम घटक आढळले आहेत जे रक्त कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातील काही अशा सवयींविषयी माहिती सांगत आहोत ज्या ब्लड कॅन्सरचा धोका वाढवण्याची घातक ठरू शकतात. या सवयींना वेळीच रोखलं नाही तर तुम्ही तुमचे आरोग्य संकटात टाकू शकता.

धूम्रपानाचे सेवन

धूम्रपान आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, ते डीएनएचे नुकसान करते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरीराला रोगांशी लढण्यात अडथळा निर्माण होतो. म्हणजेच तुमची ही समस्या कर्करोगाच्या समस्येला रोखण्यास समस्या निर्माण करते. हे ध्यानात घेणे गरजेचे आहे की दीर्घकाळ धूम्रपान करण्याची सवय ब्लड कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढवत असते.

अल्कोहोलचे अतिसेवन

धुम्रपानाबरोबरच आणखीन एक वाईट सवय जोडली जाते ती म्हणजे मद्यपान करण्याची सवय. मद्यपानाचे जास्ती सेवन हाडांच्या आत असलेल्या अस्थिमज्जा नष्ट होतात. ही अशी जागा आहे जिथे रक्तपेशी तयार होतात. जेव्हा जास्त प्रमाणात मद्यपान केले जाते तेव्हा नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा थांबते. यामुळे रक्त कर्करोगाचा धोका हळूहळू वाढत जातो.

रसायनांचा संपर्क

बेंझिन सारखी काही धोकादायक रसायने शरीरात दीर्घकाळ राहिल्यास रक्ताचा कर्करोग होऊ शकतात. सिगारेटचा धूर, पेट्रोल आणि काही प्लास्टिक उत्पादनांमध्ये बेंझिन आढळते. या रसायनांच्या सतत संपर्कात राहिल्याने डीएनए खराब होतो आणि कर्करोगाचा धोका वाढतो.

रेडिएशन

जर एखाद्या व्यक्तीला जास्त काळ हाय रेडिएशनच्या संपर्कात ठेवले तर ते त्याच्या पेशींच्या डीएनएमध्ये बदल घडवू शकते. डीएनएला होणारे हे नुकसान हळूहळू रक्ताच्या कर्करोगाचे रूप धारण करू शकते. सामान्य जीवनात हा धोका कमी असतो. जे लोक हाय रेडिएशनच्या संपर्कात दररोज काम करत आहेत त्यांना ब्लड कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे.

लठ्ठपणा

लठ्ठपणा हा सातत्याने वाढत चाललेली आरोग्य समस्या आहे ज्यामुळे अनेक आजारांना खुले आमंत्रण मिळते. लठ्ठपणा हे केवळ एकाच नव्हे तर अनेक प्रकारच्या कर्करोगाचे मूळ कारण आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की निरोगी वजन राखल्याने काही रक्त कर्करोग, विशेषतः ल्युकेमिया, टाळता येतात. निरोगी आहार आणि व्यायाम करून वाढलेले वजन कमी करता येऊ शकते.

वेगाने वाढत चाललंय शरीरातलं High Cholesterol? विषारी घाणेरडं कोलेस्ट्रॉल क्षणात पडेल बाहेर, फक्त या देसी पदार्थांचे सेवन करा

FAQs (संबंधित प्रश्न)

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
चांगला आहार आणि व्यायाम करून तुम्ही ब्लड कॅन्सरचा धोका टाळू शकता.

ब्लड कॅन्सरची लक्षणे
थकवा आणि अशक्तपणा, वारंवार होणारे संसर्ग, सहजपणे जखमा होणे किंवा रक्तस्त्राव होणे, हाडे किंवा सांध्यांमध्ये वेदना होणे.

Web Title: If you dont avoid these 5 daily mistakes you will definitely get blood health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या
1

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

Periodontitis: जबडा सडवू शकतो ‘हा’ आजार, 32 दात तुटण्याआधी त्वरीत करा 5 कामं
2

Periodontitis: जबडा सडवू शकतो ‘हा’ आजार, 32 दात तुटण्याआधी त्वरीत करा 5 कामं

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत
3

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

सतत पोट फुगलेलं राहतं? गॅस वरती चढतेय… तव्यावर भाजून बनवा घरगुती चूर्ण; बद्धकोष्ठता-मुळव्याध्यावर घरगुती उपाय
4

सतत पोट फुगलेलं राहतं? गॅस वरती चढतेय… तव्यावर भाजून बनवा घरगुती चूर्ण; बद्धकोष्ठता-मुळव्याध्यावर घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.