Fresh and lovely woman washing her face
सुंदर दिसावं, त्वचा नितळ दिसावी, मेकअप न करताही चेह-यावर तेज दिसावं पण ते कसं….त्यासाठी तुम्हाला फक्त चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. झोपण्यापूर्वी चेहरा धुवून झोपा म्हणजे दिवसभर जो काही चेह-यावरील मेकअप,धूळ हे सगळं स्वच्छ होईल. अमेरिकेत यावर सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यावेळी अनेकजण झोपण्यापूर्वी चेहरा धुण्यास विसरतात. असं केल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज होऊ लागते. (beauty tips) (face wash)
चेहरा धुणे गरजेचं का आहे ?
निरोगी दिसण्यासाठी चेहरा धुणे खूप महत्वाचे आहे. तुमचा चेहरा दिवसभर उष्णता, आर्द्रता आणि धूळ यांच्या सतत संपर्कात असतो. यामुळे त्वचा निस्तेज दिसते. जर आपण आपल्या त्वचेची स्वच्छता ठेवली नाही तर मुरुमांसह त्वचेशी संबंधित इतर समस्या सुरू होतील. म्हणूनच फेस क्लिन्जिंग करणं खूप गरजेचं आहे.

किती वेळा चेहरा धुवावा ?
साधारणपणे दिवसातून दोनदा चेहरा धुवावा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्वचेवर साचलेला धुळीचा थर निघून जातो. त्वचेच्या प्रकारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.
[read_also content=”बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताचे बळावतात आजार, परिणामी होते कमजोर; योग्य वेळी उपचार आवश्यक : डॉ. नारखेडे https://www.navarashtra.com/alifestyle/dr-narkhede-said-aggravating-diseases-of-liver-due-to-changing-lifestyle-resulting-in-weakening-treatment-required-at-right-time-nryb-415324/”]
किमान दोन वेळा तरी चेहरा धुवावा
दिवसातून किमान दोनदा तरी चेहरा धुवावा. जर तुमची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुवू शकता. चेहरा धुतल्यानंतर त्यावर तुम्ही मॉश्चराईजर लावयला विसरू नका. सकाळी उठल्यावरही पाण्याचे हबके चेह-यावर शिंपडा…यामुळे, चेह-यावरील सूज कमी होण्यास मदत होईल.

चेहरा धुताना काय लावावं?
चेहरा धुताना मुख्यत: चांगल्या फेसवॉशचा वापर करावा. हा फेसवॉश निवडताना तुम्ही तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. पुरूषांनीही फेसवॉश वापरावा. फेसवॉश किंवा साबण चेह-यावर रगडू नये. नाजूक हातांनी चेह-यावर मसाज करावा. त्यामुळे चेहरा अधिक तजेलदार होतो.






