Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान

Foods For Male Infertility: वंध्यत्वाची तक्रार केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आढळते. सध्या पुरूषांमध्ये ही तक्रार अधिक वाढलेली दिसून येत आहे. मात्र आम्ही या लेखात देत असलेले हे 5 पदार्थ नैसर्गिकरित्या वंध्यत्व काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 27, 2024 | 11:01 AM
पुरूषांमधील वंध्यत्व कमी करण्यासाठी पदार्थ

पुरूषांमधील वंध्यत्व कमी करण्यासाठी पदार्थ

Follow Us
Follow Us:

पुरुष वंध्यत्व हे सहसा वीर्य कमी झाल्यामुळे होते. पुरुषांमध्येही जननक्षमतेची चिंता वाढत आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता प्रभावित होत आहे. सध्या ही समस्या वाढताना दिसून येत आहे. वेळीअवेळी खाणं, कामाचा ताण आणि अनेक बदल यामुळे ही समस्या केवळ महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही वाढत आहे. पण काही खास पदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमची प्रजनन क्षमता वाढवू शकता. जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थांबद्दल. 

आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही विशेष पदार्थ सांगितले आहेत, जे नेहमीच्या आहारात समाविष्ट केल्यानंतर पुरूषांना त्यांचे स्पर्म काऊंट वाढविण्यात मदत करतील आणि यामुळे वंध्यत्वाची समस्याही निघून जाण्यास मदत मिळेल. (फोटो सौजन्य – iStock) 

ऑयस्टर वा सीप

सीप खाऊन वाढवा स्पर्म काऊंट

ऑयस्टरमध्ये भरपूर झिंक असते, जे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. तसंच यामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडदेखील भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात. कोणत्याही पुरूषाला स्पर्म काऊंट कमी वाटत असेल तर त्यांनी या पदार्थाचा आहारात समावेश करून घ्यावा. 

हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा

अक्रोड

अक्रोडचा करा आहारात समावेश

अक्रोड बऱ्याच जणांना बदाम वा बेदाण्यांसारखे खायला आवडत नाही. मात्र अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि अल्फा-लिनोलेनिक ॲसिड असते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरूषांनी दिवसातून १-२ अक्रोड खाल्ल्यास त्याचा फायदा मिळू शकतो. 

टोमॅटो

टॉमेटोने वाढेल शुक्राणूंची संख्या

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. नियमित भाज्यांमध्ये टॉमेटोचा वापर अधिक करावा अथवा सलाड स्वरूपात नियमित टॉमेटो खाल्ल्यास पुरूषांना याचा फायदा मिळू शकतो. 

हेदेखील वाचा – लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

ब्रोकोली

ब्रोकोलीचा करा वापर

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. ब्रोकोली ही भाजी शिजवून खाल्ल्यास त्याची चवही चांगली लागते अथवा सलाडमध्ये त्याचा उपयोग करून खावे. 

ग्रीक योगर्ट 

ग्रीक योगर्टचा करा समावेश

ग्रीक योगर्टमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक असतात. तुम्ही आपल्या आहारात अथवा नाश्त्यामध्ये ग्रीक योगर्टचा समावेश करून घेऊ शकता. 

हे लक्षात ठेवा

या खाद्यपदार्थांबरोबरच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणेही गरजेचे आहे. धुम्रपान, मद्यपान आणि तणावापासून दूर राहा. नियमित व्यायाम करा. आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करा आणि दुपारचे वा रात्रीचे जेवण वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा. तसंच दिवसभरात ८ तास व्यवस्थित झोप घ्या. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: 5 best foods to boost male fertility and increase sperm count

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Health News
  • male infertility

संबंधित बातम्या

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
1

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
3

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
4

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.