
EYVA Metabolic Tracker
Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
‘इंडिया वेलनेस इंडेक्स २०२६’ या अहवालात ३०,००० हून अधिक प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांच्या ३५ लाखांपेक्षा जास्त अनामिक (अन्-ऑनिमाइज्ड) आरोग्य नोंदींचे विश्लेषण करण्यात आले. कमी ‘वेलनेस स्कोअर’ असलेल्या नागरिकांमध्ये दीर्घकाळ बसून प्रवास, रात्री उशिरा व भरपूर जेवण, जेवणानंतर शारीरिक हालचालींचा अभाव, उशिरा कॅफीनचे सेवन आणि अपुरी विश्रांती या सवयी प्रामुख्याने दिसून आल्या आहेत.
अहवालानुसार देशभरातील सुमारे ५४ टक्के नागरिक रात्री ९ नंतर जेवतात. महानगरांमध्ये ही प्रवृत्ती अधिक आहे. मुंबईत सर्वाधिक उशिरा (६४% नागरिक रात्री ९:३० नंतर), तर दिल्लीत सर्वाधिक प्रमाणात जेवण घेतले जाते. उशिरा जेवणाऱ्यांमध्ये झोपेची गुणवत्ता खालावलेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा अधिक असल्याचे नोंदवले गेले आहे.
या संदर्भात ‘आयवा’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुनील मधिकटला म्हणाले, “रात्री उशिरा जेवण्याची सवय देशभरात वाढत आहे. लांबचा प्रवास हे यामागील प्रमुख कारण असले, तरी घरातील नोकरी करणारी व्यक्ती उशिरा येत असल्याने संपूर्ण कुटुंबाची जेवणाची वेळ बदलते. रात्री उशिरा भरपूर जेवण, ताणतणाव आणि कॅफीनमुळे रात्रभर हृदयगती वाढलेली राहते आणि सकाळी शरीर पूर्ण ताजेतवाने होत नाही. या स्थितीला आम्ही ‘मेटाबॉलिक हँगओव्हर’ असे म्हणतो.”
या अहवालातून भारतातील विविध प्रमुख शहरांमधील नागरिकांच्या जीवनशैली आणि आरोग्याशी संबंधित लक्षणीय प्रादेशिक तफावत समोर आली आहे. मुंबईमध्ये ५२ टक्के वापरकर्ते दैनंदिन प्रवासासाठी लोकल ट्रेन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असल्याने त्यांचे चालण्याचे प्रमाण जास्त आहे; मात्र गर्दीच्या वेळेतील तीव्र ताणतणावामुळे त्यांच्यात हृदयगतीशी संबंधित निर्देशांक वाढलेले आढळले. याशिवाय, मुंबईत रात्री ९:३० नंतर जेवण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक म्हणजेच ६४ टक्के नोंदवले गेले. दिल्ली-एनसीआर प्रदेशात हिवाळ्यातील धुरक्यामुळे (स्मॉग) लोकांच्या बाहेरच्या शारीरिक हालचाली ३० टक्क्यांनी घटल्या, ज्यामुळे श्वसनावरील ताण वाढून नागरिकांचा ‘मेटाबॉलिक वेलनेस स्कोअर’ ६ ते ९ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, बेंगळुरूमध्ये ४४ टक्के नोकरदारांना कामाच्या दिवशी दीर्घकाळ बसून प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन हालचाली १८ टक्क्यांनी कमी आढळल्या. परंतु, उद्याने आणि मोकळ्या हिरव्या परिसरात वेळ घालवणाऱ्या १० पैकी ७ जणांनी त्यांची मनःस्थिती अधिक सकारात्मक असल्याचे नमूद केले. हैदराबादमध्ये ६४ टक्के नोकरदार व व्यावसायिक रात्री १० नंतर जेवत असल्याने त्यांच्यात ‘मेटाबॉलिक हँगओव्हर’चा नमुना वारंवार दिसून आला, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि चयापचय गुणांकनामध्ये अस्थिरता नोंदवण्यात आली.
अहवालात स्पष्ट झाले आहे की, एकाच कुटुंबात एकाच प्रकारचे जेवण घेतले तरी दोन व्यक्तींच्या शरीरावर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. त्यामुळे सर्वांसाठी एकच आहारसल्ला प्रभावी ठरत नाही.मात्र, जेवणानंतर थोडे चालणे (शतपावली) करणाऱ्या सुमारे ३७ टक्के वापरकर्त्यांमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी १२ ते १६ टक्क्यांनी अधिक नियंत्रित राहिली आणि झोपही उत्तम झाली. जीवनशैलीत लहान सकारात्मक बदल करणाऱ्या वापरकर्त्यांच्या वेलनेस स्कोअरमध्ये तीन महिन्यांत ८ ते १२ टक्क्यांची सुधारणा नोंदवण्यात आली आहे.
Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे