Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Migraine Relief Tips: मायग्रेनचा त्रासामुळे दैनंदिन कामे करण्यास अडथळा येतो. परंतु, यामागची कारणे कोणती तसेच हा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 20, 2026 | 07:00 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मायग्रेनच्या वेदनांपासून आराम हवा?
  • जीवनशैलीतील ‘हे’ बदल ठरतील फायदेशीर
  • डोकेदुखीपासून मिळेल आराम
आजकाल मायग्रेन हा खूप सामान्य आजार झाला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेन म्हणजे केवळ एक सामान्य डोकेदुखी नाही तर,मायग्रेनला सायकोसोमेटिक डिसऑर्डर मानले जाते. मायग्रेनची वेदना बहुतेकदा डोक्याच्या पुढच्या भागात, कपाळावर किंवा डोळ्यांच्या आसपास जाणवते. यासोबतच मळमळ, उलट्या आणि प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे अस्वस्थता जाणवू शकते. काहीवेळा मायग्रेनचा झटका काही तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंत राहू शकतो. वेदना इतकी तीव्र असू शकते की त्यामुळे दैनंदिन कामे करणे सुद्धा अवघड होऊ शकते. मायग्रेनचा त्रास जाणवल्यास कोणती काळजी घ्यावी, जाणून घेऊयात.

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

मायग्रेनचा त्रास सुरु झाल्यास काय करावे?

जेव्हा मायग्रेनचा त्रास जाणवतो, तेव्हा सर्वप्रथम प्रखर प्रकाश आणि गोंगाटापासून दूर व्हा. शांत, मंद प्रकाशाच्या खोलीत थोडा वेळ विश्रांती घेणे फायदेशीर ठरू शकते. प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे अनेक लोकांचा त्रा, वाढू शकतो. काही लोकांना डोक्यावर किंवा मानेवर थंड पट्टी ठेवल्यानेही आराम मिळतो. जर डोकेदुखी वारंवार होत असेल किंवा खूप त्रासदायक असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचे नेमके कारण शोधून त्यावर योग्य उपचार करता येतील.

हलक्या हाताने मालिश करा

मायग्रेनच्या वेळी किंवा तो टाळण्यासाठी काही लोकांना डोक्याच्या मालिशमुळे आराम मिळू शकतो. डोके आणि मानेच्या स्नायूंवरील ताणामुळे काही लोकांमध्ये डोकेदुखी वाढू शकते. अशा परिस्थितीत, तणाव कमी करण्यास आणि आरामदायी वाटण्यास मालिश मदत करू शकते.

चांगली झोप महत्वाची

अपुऱ्या झोपेमुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. केवळ खूप कमी झोपल्यानेच नाही, तर खूप जास्त झोपल्याने किंवा झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा वारंवार बदलल्यानेही काही लोकांमध्ये मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. म्हणून, दररोज एका निश्चित वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि इतर स्क्रीनचा वापर कमी करा.

तीव्र प्रकाशापासून दूर रहा

तीव्र प्रकाश हे मायग्रेन डोकेदुखीचे एक सामान्य कारण मानले जाते. याला फोटोफोबिया म्हणतात. जर प्रकाशामुळे तुमची डोकेदुखी वाढत असेल, तर घरी किंवा कामाच्या ठिकाणी खूप तीव्र प्रकाशाचे बल्ब किंवा दिवे वापरणे टाळा. तसेच, खोलीत पूर्ण अंधार करणारे पडदे वापरा. बाहेर जाताना सनग्लासेस वापरा. जर तुम्ही संगणकावर काम करत असाल तर अँटी-ग्लेअर स्क्रीन वापरणे हे देखील उपयुक्त ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम

Web Title: Migraine relief tips lifestyle changes headache

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Headache pain
  • Health News
  • Migraine news

संबंधित बातम्या

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
1

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट
3

Walking Tips: ना जिम, ना ट्रेडमिल! फक्त चालण्याच्या पद्धतीत करा ‘हे’ सोपे बदल; शरीर राहील फिट

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
4

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.