Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reduce Household Waste: घरात रोज कचरा साचतोय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरा अन् कचरा करा कमी

Reduce Household Waste: स्वयंपाक करताना भाजी-फळांच्या साली, चहाचा चोथा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि उरलेले अन्न यांमुळे किचनमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. वेळेवर कचरा न काढल्यास दुर्गंधीही पसरू शकते. मात्र, दैनंदिन सवयींमध्ये काही सोपे बदल करून घरातील कचरा कमी करता येऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 01:30 PM
Reduce Household Waste (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Reduce Household Waste (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा
  • भाजीच्या सालींचा पुनर्वापर करा
  • कापडी पिशवी वापरा
  • मापात स्वयंपाक करा
5 Easy Ways to Reduce Household Kitchen: रोज स्वयंपाक करताना कचरा होणार त्यामुळे किचन घाण होतो. भाजी निवडल्यावर उरणारा कचरा, फळांच्या साली, चहा गाळल्यावरचा चोथा, रिकाम्या पिशव्या, उरलेलं जेवण… हे सगळं एकत्र झालं की किचन कचऱ्याचा डबा दिवसभरात भरतो. वेळेवर डबा रिकामा नाही केला तर, घरभर दुर्गंधी पसरते. हा कचरा कमी करण्यासाठी अनेक महिला विचार करतात की, या कचऱ्यासाठी नेमंक काय करावं, आपण आपल्या सवयीमध्ये थोडा बदल केला तर अर्धापेक्षा जास्त कचरा कमी होईल काय करायचं जाणून घ्या… Reduce Household Waste:

1. पहिला नियम – दोन डबे वापरा

घरातला कचरा कमी करायचा असेल तर ओला आणि सुका कचरा कधीच एकत्र टाकू नका. भारतात बहुतेक घरामध्ये सगळा कचरा एका पिशवीमध्ये टाकला जातो. त्यामुळे सगळा घाण वास येतो. त्यासाठी दोन वेगळे डबे ठेवा.

एका डब्यात फक्त ओला कचरा उदाहरणार्थ भाजीची सालं, फळांचे तुकडे, अंड्याची टरफले, उरलेला भात, जेवणाच्या संबंधित असलेले साहित्य
दुसऱ्या डब्यात सुका कचरा – प्लास्टिक, पेपर, काच. असं केलं की कचऱ्याचा वास येत नाही. आणि पालिकेची गाडी आली की त्यांनाही द्यायला सोपं जातं. जर तुम्हाला आवड असेल तर ओल्या कचऱ्यापासून तुम्ही बाल्कनीतच झाडांसाठी खत पण तयार करू शकतात.

2. साली फेकण्यापूर्वी दोनदा विचार करा

आपण भाजीची साल दिसली की लगेच कचऱ्यात टाकतो. पण सगळ्याच साली कचऱ्याच्या डब्यामध्ये जाण्यासाठी नसतात, काही सालींमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. उदाहरण घ्यायचं तर भोपळ्याच्या साल तसेच दुधीच्या सालीची चटणी चवीला मस्त लागते. बटाट्याच्या सालीचे कुरकुरतीत होणारे वेफर्स, मुळ्याची पानं, कोबीची वरची पानं, फ्लॉवरचा देठ याची पण भाजी होते. ते स्वच्छ धुऊन वापरलं तर एक नवीन पदार्थ पण मिळतो दरम्यान कचरा कमी होतो.

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

3. कापडी पिशवीची सवय लावा

भाजी मार्केटमध्ये गेल्यावर प्रत्येक भाजीसाठी एक वेगळी प्लास्टिकची पिशवी घेणे ही आपली सवय झाली आहे. घरी आल्यावर या पिशव्यांचा ढीग लागतो. नंतर त्या फेकून दिल्या जातात. त्यापेक्षा घरातून निघतानाच एक कापडी पिशवी सोबत घ्या. ती एकदाच विकत घेतली की 2-3 वर्षे आरामात चालते. धुता पण येते. आणि घरात ज्या जुन्या प्लास्टिक पिशव्या पडून आहेत, त्या फेकू नका. भाजीवाल्याकडेच परत घेऊन जा, तो त्यातच परत भाजी देईल. याने प्लास्टिक खूप कमी होईल.

4. अन्न शिजवताना मापात शिजवा

सगळ्यात जास्त कचरा उरलेल्या अन्नामुळे होतो. भारतीय घरात मापापेक्षा अधिक अन्न शिजवले जाते. तसेच ते उरले की फ्रीजमध्ये ठेवता येते. त्यानंतर 3 दिवसांनी तेच अन्न फेकून दिले जाते. असे न करता आधीच घरात कोण- किती प्रमाणात जेवणार आहे, ते ठरवा. त्यानुसार स्वयंपाक करा, यामुळे अन्न वाया जाणार नाही. आठवड्याचं मेनू आधीच ठरवून ठेवला, की घरात किती प्रमाणात किराणा येईल हे मोज-माप करता येते, असे केल्याने जास्तीचे अन्न बनवले जाणार नाही आणि वाया देखील जाणार नाही. उरलेल्या भाताचा पुलाव होतो, चपातीचा फोडणीचा चिवडा किंवा लाडू पण बनतो.

भगरीचा डोसा ते चाटपर्यंत… यंदाच्या नवरात्रीत उपवासाच्या पदार्थांचा बदलला ट्रेंड; नवीन फ्यूजन डिशेस तुम्ही ट्राय केलेत की नाही?

5. रिकाम्या बाटल्या आणि डबे फेकू नका

तेलाचा डबा संपला, लोणच्याची बरणी रिकामी झाली की आपण ती फेकून देतो. पण त्या वस्तू खूप कामाच्या असतात. काचेच्या बरण्या स्वच्छ धुऊन त्यात तुम्ही मीठ, साखर, डाळी भरून ठेवू शकता. किचनचा लूकच बदलून जातो. जुने प्लास्टिकचे डबे रोपं लावायला वापरता येतात. जुने कॉटनचे कपडे फाडून त्याचे पोछे बनवता येतात. नवीन विकत घ्यायची गरजच पडत नाही.

Web Title: 5 easy ways to reduce household kitchen waste rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Kitchen
  • kitchen tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!
1

Sweet Potato Chaat: उपवासात काहीतरी चटपटीत खायचंय? झटपट तयार करा रताळ्याची चविष्ट चाट!

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…
2

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा
3

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
4

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.