Raw Papaya Benefits: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
तब्येत चांगली ठेवायची असेल तर- तब्येत बिघडू द्यायची नसेल किंवा तब्येत नेहमीच चांगली ठेवायची असेल तर एक्सपर्ट सगळ्यात आधी डाएट सुधारायला सांगतात. म्हणजे एक्सपर्ट रोज पालेभाज्या आणि वेगवेगळी फळं खायचा सल्ला देतात. कारण भाज्या आणि फळांमधून शरीराला लागणारी बरीच पोषक तत्वं मिळतात. साधारणपणे सगळेच लोक पिकलेली फळं खातात. पण अशी पण काही फळं आहेत जी कच्ची खाऊनही फायदा देतात. असंच एक फळ म्हणजे पपई.
कच्ची पपई का भारी? - कच्ची पपई आरोग्यासाठी खूप जास्त गुणकारी मानली जाते. कच्च्या पपईने पचनक्रिया चांगली होते. यात व्हिटामिन सी चं प्रमाण भरपूर असतं. तसेच यात पॅपेन नावाचं एक एंझाइम असतं, जे पचन चांगलं करण्यासोबतच शरीराची सूज कमी करायला पण मदत करतं. इतकंच नाही तर यात अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात, जे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. तसेच कच्ची पपई त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असते.
पोटासाठी नंबर 1- कच्ची पपई खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं. पोटाच्या समस्या जसे की, गॅस, सूज आणि बद्धकोष्ठता दूर करायला पण पपई फायदेशीर ठरते. कच्च्या पपईचा जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्वचा आणि केसांसाठी- कच्च्या पपईमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामिन सी असतात, ज्यामुळे त्वचा ग्लोईंग होते. सोबतच सुरकुत्याही कमी होतात. तसेच कच्ची पपई रोज खाल्ली तर केस पण मजबूत होतात. सोबतच केसांची वाढही वेगाने होते.
सूज आणि सांधेदुखीवर आराम- कच्च्या पपईने शरीरातली सूज कमी होते. तसेच संधिवात असेल तर त्यातही आराम मिळतो. कच्च्या पपईने हाडं पण मजबूत होतात.
वजन आणि शुगर कंट्रोल- कच्ची पपई खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे तुमचं जास्त खाणं टाळलं जातं. याने तुम्हाला वजन कमी करायला मदत मिळेल. तसेच कच्च्या पपईने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होते. डायबिटीसच्या लोकांसाठी कच्ची पपई खूप फायदेशीर ठरते.
कशी खाल?- कच्ची पपई तुम्ही सलादच्या रूपातही खाऊ शकता. कच्च्या पपईचा पराठा सुद्धा टेस्टी लागतो. कच्च्या पपईची भाजी सुद्धा टेस्टी लागते. कच्च्या पपईचा ज्यूसही तुम्ही पिऊ शकता. कच्च्या पपईचं लोणचं देखील केलं जातं.म्हणजे थोडक्यात, पपई पिकायची वाट बघू नका. कच्ची पपई पण डाएटमध्ये घ्या आणि फरक बघा.