
जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय
न्यूझीलंड
न्यूझीलंडचं सौंदर्य पाहिल्यावर ते एखाद्या सिनेमातील दृश्यासारखं वाटतं. इथे खोल फ्योर्ड्स, सक्रिय ज्वालामुखी, भव्य ग्लेशियर आणि हिरव्यागार कुरणं एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. साहसप्रेमींना ट्रेकिंग, बंजी जंपिंग, कायकिंगसारखे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. माओरी संस्कृतीचा वारसा आणि दाट जंगलं यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडणाऱ्या प्रवाशांसाठी न्यूझीलंड एक परफेक्ट ठिकाण ठरतं.
ग्रीस
ग्रीस हे पांढऱ्या रंगाच्या घरांनी सजलेले बेट, निळ्याशार समुद्र आणि ऐतिहासिक वारसा यासाठी जगभरात ओळखलं जातं. येथील प्राचीन अवशेष हजारो वर्षांची कथा सांगतात. सेंटोरिनीचा मनमोहक सूर्यास्त असो किंवा अथेन्समधील ऐतिहासिक वास्तू, ग्रीसमध्ये समुद्रकिनारे आणि संस्कृती यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळतो. भूमध्य समुद्राचं आकर्षण ग्रीसला 2026 साठीही एक सदाबहार पर्यटनस्थळ बनवतं.
इटली
इटली म्हणजे कला, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ. पुनर्जागरण काळातील शहरं, डोंगर उतारांवरील द्राक्षांची शेती आणि अमाल्फीपासून सिंक टेरेपर्यंत पसरलेले सुंदर किनारे हे इटलीचं वैशिष्ट्य आहे. इथलं स्वादिष्ट खाद्यसंस्कृती, ऐतिहासिक वास्तू आणि मनोहारी दृश्यं तुमच्या प्रवासाला अविस्मरणीय बनवतात. फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी इटली म्हणजे स्वर्गच.
स्पेन
स्पेनमध्ये विविधतेने नटलेली दृश्यं पाहायला मिळतात. सुनहरे समुद्रकिनारे, मूरिश शैलीतील वास्तुकला, उत्तरेकडील हिरवीगार निसर्गरचना आणि उत्साही शहरं हे सगळं स्पेनला खास बनवतं. येथील खाद्यपदार्थ, संगीत आणि उत्सव देशाच्या संस्कृतीला अधिक रंगतदार करतात. शांत सुट्टी असो किंवा सांस्कृतिक भटकंती, दोन्हीसाठी स्पेन एक उत्तम पर्याय आहे.
नॉर्वे
नॉर्वेचं सौंदर्य थक्क करणारं आहे. खोल फ्योर्ड्स, उंच कड्या, विशाल ग्लेशियर आणि आर्क्टिक प्रदेशातील आकाश यामुळे इथे नाट्यमय दृश्यांची अनुभूती येते. नॉर्दर्न लाइट्स, मिडनाइट सन आणि शांत, सुंदर गावं नॉर्वेच्या किनारी व पर्वतीय भागांना वेगळीच ओळख देतात. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी नॉर्वे हा एक स्वप्नवत प्रवास ठरू शकतो. 2026 मध्ये तुमची ट्रिप केवळ सहल न राहता आयुष्यभर आठवणीत राहणारा अनुभव व्हावा, असं वाटत असेल तर ही ठिकाणं नक्कीच तुमच्या यादीत असायला हवीत.