Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च…

5 World Famous Luxury Trains : रेल्वेचा प्रवास तर तुम्ही अनेकदा केला असेल पण लाखो रुपयांच तिकीट खर्च करुन तुम्ही कधी रेल्वेचा प्रवास केला आहे का? या लाखोंच्या रेल्वेत नक्की मिळतं तरी काय... जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 24, 2026 | 08:40 AM
सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च...

सामन्यांना परवडणार नाही या ट्रेन्सचा प्रवास! जगातील 5 Luxury Trains ज्यांचं तिकिट खरेदी करण्यात वर्षभराची कमाई होईल खर्च...

Follow Us
Follow Us:
  • जगातील काही लक्झरी ट्रेनमध्ये प्रवास म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलसारखा शाही अनुभव मिळतो.
  • या ट्रेनमध्ये आलिशान सुविधा, उत्तम जेवण आणि खास सेवा दिली जाते.
  • अशा ट्रेनचे भाडे लाखो रुपयांमध्ये असून ते सर्वांसाठी परवडणारे नसते.
रेल्वे हा लांबच्या प्रवासासाठीचा सर्वात सुखकर आणि परवडणारा प्रवास मानला जातो. अनेक नोकरदार वर्गांसाठी रेल्वेचा प्रवास त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजवर तुम्ही अनेक रेल्वे गाड्यांनी प्रवास केला असेल. पण तुम्ही कधी रेल्वेमध्ये फाईव्ह स्टार हाॅटेलसारखा अनुभव घेतला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात अशा काही नामांकित आणि लग्झरी ट्रेन्स आहेत ज्यात प्रवास करणं कोणत्या शाही थाटाहून कमी नाही. मुख्य म्हणजे, या ट्रेन्समध्ये प्रवास करणे प्रत्येकाला झेपण्यासारखं नाही कारण यांची किंमत इतकी आवाक्याबाहेर आहे की या किमतीचा तुम्ही कधी स्वप्नतही विचार करणार नाही. चला याविषयी जर सविसत्तर माहिती जाणून घेऊया.

रेल्वेचा प्रवास म्हणजे गर्दी, गोंधळ, भांडणं, फेरीवाल्यांच्या हाका… याच गोष्टी आपल्या पहिल्या ध्यानात येताता. पण या लग्झरी ट्रेन्समध्ये तुम्हाला या कोणत्याही गोष्टीचा अनुभव येणार नाही. इथे प्रवेश करताच तुम्हाला ड्रींक सर्व्ह केली जाईल, तुमच्या स्वागतासाठी लाल गालिछा पसरवला जाईल आणि अशा अनेक गोष्टी घडतील ज्या ट्रेनमध्ये अनुभवण्याचा आपण विचारही करु शकत नाही.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

महाराजा एक्सप्रेस – भारत

भारतातही लग्झरी रेल्वे आहे जी सामान्य रेल्वेच्या तुलनेत तुम्हाला एक शाही आणि आलिशान अनुभव देऊन जाईल. या रेल्वेचे नाव महाराजा एक्सप्रेस असून इथे तुम्हाला खरोखर एका राजासारखा अनुभव मिळेल. यात प्रवाशांसाठी आलिशान शयनकक्ष, भोजन कक्ष, बार आणि मोठे आरसे अशा अनेक सुविधा पुरवल्या जातात. ही रेल्वेगाडी तुम्हाला दिल्लीहून आग्रा, जयपूर आणि राजस्थानमधील अनेक किल्ल्यांवर घेऊन जाते. रेल्वेच्या भाड्याविषयी बोलणं केलं तर या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला साधारण ५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. यातही जर तुम्ही प्रेसिडेंशियल सीट बुक करायला गेलात तर याचा खर्च २० लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकतो.

व्हेनिस सिम्प्लॉन-ओरिएंट-एक्सप्रेस – युरोप

जुन्या हाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये या ट्रेनला अनेकदा दाखवण्यात आले आहे. रेल्वेचे नाव व्हेनिस सिम्प्लॉन-ओरिएंट-एक्सप्रेस असे असून ही युरोपमधील एक लोकप्रिय क्लासिक रेल्वे मानली जाते. ही रेल्वे लंडन ते व्हेनिसपर्यंतचा प्रवास गाठते आणि यादरम्यान प्रवाशांना एक अद्भूत अनुभव देऊन जाते. इथे जुन्या काळातील फर्निचर, चांदीची भांडी आणि उत्कृष्ट क्रिस्टल ग्लास अशा अनेक सुबक गोष्टी पाहायला मिळतील. गाडीच्या तिकीटाचे भाडे बे साधारण ३ लाख ते ८ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

सेवन स्टार्स इन क्यूशू – जपान

जपानमध्येही लग्झरी रेल्वेची सुविधा आहे ज्याचे नाव सेवन स्टार्स इन क्यूशू असे आहे. आपल्या तंत्रज्ञान आणि शिस्तीसाठी ओळखला जाणारा जपान आलिशानतेच्या बाबतीतही काही मागे राहिला नाही. या खास ट्रेनमध्ये एकावेळी फक्त ३० प्रवासी बसू शकतात. याच्या आत प्रवाशांनी अनेक सोईसुविधांसह उत्कृष्ट जपानी कला पाहता येते. रेल्वेच्या आतील भाग लाकूडकामाने सजवलेला आहे. या ट्रेनचे तिकिट मिळणे कोणत्या लाॅटरीहून कमी नाही. याचे भाडे अंदाजे ४ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकते.

रोवोस रेल – दक्षिण आफ्रिका

या रेल्वेला आफ्रिकेचा अभिमान म्हणूनही ओळखले जाते. जर तुम्हाला वन्य प्राणी आणि सुंदर आफ्रिकन जंगले पाहायची असतील तर तुम्ही या आलिशान रेल्वेची सफर करु शकता. या ट्रे्नचे डबे व्हिक्टोरियन शैलीत सजवलेले आहे. तर इथे उत्कृष्ट वाईन आणि खाद्यपदार्थांचाही आनंद लुटता येतो. या रेल्वेच्या किमतीविषयी बोलणे केले तर याचे भाडे २.५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या

गोल्डन ईगल – युरोप

बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर सरोवरांमधून धावणारी ही रेल्वे ‘ट्रान्स-सायबेरियन’ मार्गावर धावते, जिला जगातील सर्वात लांब आणि सर्वात नेत्रदीपक रेल्वे मार्गांपैकी एक मानले जाते. ही एक अशी रेल्वे आहे जिथे तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी राखली जाईल. या ट्रेनमध्ये तुम्हाला २४ तास पर्सनल अटेंडेंट दिली जाते जी तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी राखते. इथे प्रवाशांना पियाने संगीत आणि उत्कृष्ट जेवणाचाही आस्वाद घेता येतो. या आलिशान रेल्वेचे भाडे सुमारे १२ ते ३० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: 5 most luxury trains of the world where purchasing a ticket would cost an entire years earnings travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Special Train
  • travel news

संबंधित बातम्या

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
1

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
3

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
4

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.