जीभ पांढरी होण्याची कारणे (फोटो सौजन्य - iStock)
जीभ हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो खाण्यास, बोलण्यास आणि गिळण्यास मदत करतो. यासोबतच जिभेमध्ये असलेल्या चवीच्या कळ्या देखील अन्नाची चव सांगतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमची जीभ तुमच्या शरीरात सुरू असलेल्या अनेक समस्यांबद्दल संकेत देते. सकाळी उठल्यावर आपल्या जिभेवर एक पांढरा थर तयार होतो, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
परंतु जिभेवर पांढरा थर तयार होणे हे अनेक आरोग्य समस्यांचे कारण असू शकते. सामान्यतः हे तोंडाची स्वच्छता नीट न राखल्याने, डिहायड्रेशनमुळे, संसर्गामुळे किंवा पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांमुळे होते. या लेखात आम्ही तुम्हाला Cleveland Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार जिभेवर पांढरा थर तयार होण्याची कारणे सांगणार आहोत (फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमध्ये विष जमा होणे
जिभेवर काय होतो परिणाम
जिभेवर पांढरा थर तयार होण्याचे पहिले कारण म्हणजे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे विषारी पदार्थ जिभेवर पांढऱ्या थराच्या स्वरूपात दिसतात. जेव्हा तुम्ही असंतुलित आहार घेत असता, अन्नात फायबरची कमतरता असते किंवा तुम्ही वारंवार बाहेर तळलेले अन्न खात असता तेव्हा असे होते.
Gut Health: आतड्यांच्या स्वच्छतेसाठी करा 7 काम, नैसर्गिक गट क्लिनिंग पद्धतीने लगेच होईल पोट साफ
खराब ओरल हायजीन
तोंडाची अस्वच्छतादेखील जिभेवर पांढरा थर तयार करू शकते. जरी तुम्ही दररोज दात आणि जीभ स्वच्छ करत नसाल तरी जिभेच्या थरावर बॅक्टेरिया, मृत पेशी आणि अन्नाचे कण जमा होऊ शकतात. हे एका पांढऱ्या थरात बदलतात, ज्यामुळे केवळ तोंडाची दुर्गंधी येत नाही तर संसर्गाचा धोकादेखील वाढतो.
डिहायड्रेशन आणि कोरडे तोंड
नक्की कारणे काय आहेत
डिहायड्रेशन आणि कोरडे तोंड हे जिभेवर पांढरे थर येण्याचे कारण असू शकते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत नसाल तर लाळ कमी तयार होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडते. लाळेमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया नियंत्रित ठेवतात. अशा परिस्थितीत, लाळेच्या कमतरतेमुळे, बॅक्टेरिया सहजपणे वाढू लागतात आणि जिभेवर पांढरा थर तयार होतो.
रात्री केलेल्या चुका सडवू शकतील तुमचे आतडे, समजल्यावर त्वरीत बदला सवय
पोट किंवा यकृताच्या समस्या
जिभेवर पांढरा थर पोट किंवा यकृताशी संबंधित आजारांमुळेदेखील होऊ शकतो. पोटाच्या समस्या जसे की आम्लपित्त, गॅस किंवा बद्धकोष्ठता यामुळे जिभेवर पांढरा थर तयार होऊ लागतो. तुम्ही जर नेहमी या समस्यांनी हैराण असाल तर तुमची जीभ सफेद होऊ शकते. त्यामुळे वेळीच याची काळजी घ्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.