
भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण
या मंदिरांचे वर्षातून एकदाच उघडण्यामागे धार्मिक समजुती, हवामानाची परिस्थिती किंवा पौराणिक कथा कारणीभूत आहेत. काही ठिकाणी बर्फवृष्टी, दुर्गम मार्ग, तर काही ठिकाणी विशिष्ट तिथीचे विशेष महत्त्व असल्यामुळे असे नियम पाळले जातात. या मंदिरांची प्राचीन रचना, ऐतिहासिक मूर्ती आणि त्यांच्याशी जोडलेले रहस्य भाविकांना विशेष आकर्षित करते. असे मानले जाते की या मंदिरांचे दर्शन घेतल्याने विशेष पुण्य लाभते. चला तर जाणून घेऊया अशाच काही अनोख्या मंदिरांविषयी.
हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच, दिवाळीच्या काळात भाविकांसाठी खुले केले जाते. दिवाळीच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडतात आणि सुमारे दहा दिवस भक्तांना दर्शनाची संधी मिळते. त्यानंतर मंदिर पुन्हा बंद केले जाते.
मंदिराशी जोडलेले रहस्य
स्थानिक लोकांच्या मते, मंदिराच्या गर्भगृहात वर्षभर एक दिवा अखंड पेटलेला असतो. तसेच, अर्पण केलेले फुलं आणि नैवेद्य ताजेच राहतात. हे देवीच्या चमत्काराचे प्रतीक मानले जाते.
लोककथा
समजुतीनुसार, देवी हसनांबा वर्षभर भक्तांचे रक्षण करत असतात. त्यामुळे मंदिराचे द्वार बंद ठेवले जाते आणि दिवाळीच्या दिवशी, देवीची शक्ती विशेष प्रबळ असते असे मानून, पूजा व दर्शनाचा विशेष सोहळा होतो.
स्थान
हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात आहे आणि आपल्या अनोख्या परंपरेमुळे प्रसिद्ध आहे.
कधी उघडते?
मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच, नागपंचमीच्या दिवशी उघडले जातात.
उपासना
येथे भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केली जाते.
वैशिष्ट्य
असे मानले जाते की या मंदिराची उभारणी ११व्या शतकात परमार राजा भोज यांनी केली. मंदिरातील मूर्ती नेपाळमधून आणली गेली असून, त्यात भगवान शिव दहा फण्यांच्या नागावर विराजमान आहेत. त्यांच्या सोबत पार्वती देवी आणि गणेशाची प्रतिमा आहे.
पौराणिक मान्यता
लोकविश्वासानुसार, नागराज तक्षक वर्षभर येथे निवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशीच भक्तांना दर्शन देतात.
स्थान
हे मंदिर उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात आहे.
कधी उघडते?
दसऱ्याच्या दिवशीच हे मंदिर वर्षातून एकदाच भाविकांसाठी खुले केले जाते.
उपासना
या मंदिरात रावणाची सुमारे पाच फूट उंच मूर्ती आहे आणि त्यांची पूजा केली जाते.
कथा
या मंदिराची स्थापना १८६८ साली गुरु प्रसाद शुक्ल यांनी केली. येथे रावणाला केवळ राक्षस म्हणून नाही, तर एक विद्वान ब्राह्मण, महान शिवभक्त म्हणून मान दिला जातो. त्यामुळे येथे रावणदहन न होता त्यांची पूजा व श्रृंगार केला जातो.
स्थान
हे मंदिर ओडिशातील पुरी येथे आहे.
कधी उघडते?
वार्षिक जगन्नाथ रथयात्रेच्या काळात सुमारे नऊ दिवसांसाठीच हे मंदिर खुले असते.
उपासना
हे मंदिर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रेला समर्पित आहे.
मान्यता
असे मानले जाते की रथयात्रेदरम्यान नगरभ्रमणानंतर भगवान जगन्नाथ येथे काही दिवस वास्तव्य करतात. या काळातच भक्तांना दर्शन मिळते, उर्वरित वर्षभर मंदिर रिकामे असते.
Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?
स्थान
हे मंदिर मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात स्थित आहे.
कधी उघडते?
मंदिराचे दरवाजे वर्षातून फक्त एकदाच, महाशिवरात्रीच्या दिवशी उघडले जातात.
उपासना
येथे भगवान शिवाची सोमेश्वर महादेव म्हणून पूजा केली जाते.
पौराणिक कथा
कथेनुसार, राजा दक्षाच्या श्रापामुळे चंद्रदेव क्षीण झाले होते. त्या श्रापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून कठोर तपस्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि चंद्रदेवांना आरोग्याचे वरदान दिले. मध्ययुगीन आक्रमणे आणि त्यानंतर उद्भवलेल्या ऐतिहासिक व धार्मिक कारणांमुळे हे मंदिर आजही वर्षातून केवळ एकदाच खुले केले जाते. ही मंदिरे आजही श्रद्धा, परंपरा आणि रहस्य यांचा अनोखा संगम जपून ठेवत आहेत.