Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

Om Banna Temple : एका अपघातातून उभी राहिली अनोखी आस्था, बाईक बनली भक्तांची देवता! ओम बन्नाला समर्पित राजस्थानचे हे मंदिर जिथे बाईकची केली जाते पूजा. हे मंदिर प्रवाशांचे अपघातापासून संरक्षण करत असल्याचा दावा केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 11:00 AM
अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

Follow Us
Close
Follow Us:
  • राजस्थानच्या अनोख्या मंदिराची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
  • या मंदिरात कोणत्या देवतेची पूजा केली जात नाही तर बाईकची पूजा केली जाते.
  • व्यक्तीच्या अपघातानंतर त्याच्या नावावर हे मंदिर तयार करण्यात आले असून याची कथा फार रोमांचक आणि आस्थेने जोडलेली आहे.
भारतात अनेक अद्वितीय मंदिर आहेत ज्यांच्याविषयी आपण ऐकले असेल. प्रत्येक मंदिरात देवी-देवतांची पूजा केली जाते. तसे तर हिंदू, धर्मात अनेक देवतांची पूजा केली जाते पण तुम्ही कधी कोणत्या बाईकची पूजा करत असल्याचे ऐकले किंवा पाहिले आहे का? होय, ही खरी घटना असून राजस्थानच्या किशनगड रेणवाल शहरापासून जयपूरला जाणाऱ्या रस्त्यावर हे अनोखे मंदिर वसले आहे, जिथे चक्क एका बाईकची पूजा केली जाते. हे मंदिर तेथील लोकांच्या आस्थेचे केंद्र बनले असून याच्या निर्मितीमागे एक रंजक कथा दडलेली आहे जी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

मंदिराचा इतिहास

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात आपल्याला या अनोख्या मंदिराची माहिती देण्यात आली आहे. मंदिराला ओम बन्ना नावाने ओळखले जात असून हे नाव एका व्यक्तीचे होते ज्याच्या अपघातानंतर त्याच्या नावाने मंदिर स्थापित करण्यात आले. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, २ डिसेंबर १९८८ रोजी, ओम सिंग राठोड (ओम बन्ना) नावाचा एक तरुण जोधपूरजवळ त्याची रॉयल एनफील्ड बुलेट (क्रमांक आरएनजे ७७७३) चालवत होता. तो एका झाडावर आदळला आणि त्याचा तात्काळ मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तपासासाठी बाईक पोलिस ठाण्यात नेली. पण दुसऱ्या दिवशी त्यांना धक्का बसला कारण सकाळी, स्टेशनवरून बाईक गायब झाली होती. मुख्य म्हणजे नंतर त्यांना ती बाईक अपघाताच्या ठिकाणीच उभी असलेली आढळली. ही एक खोड आहे असे समजून त्यांनी ती परत आणली, इंधन टाकी रिकामी केली आणि जड कुलूपांनी साखळ्यांनी बाईकला बांधून ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस पाहता तर काय… साखळ्या तुटल्या होत्या आणि बाईक अपघाताच्या ठिकाणी परत उभी होती. हे अनेक वेळा घडल्यानंतर, स्थानिकांना लक्षात आले की बाईकने त्याच्या मालकाला सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी मोटरसायकलभोवती एक मंदिर बांधले. आज, हजारो ट्रक चालक आणि प्रवासी तिथे थांबून बाईकला दारू देतात. असे मानले जाते की ओम बन्नाचा आत्मा रात्री महामार्गावर प्रवास करतो आणि चालकांना अपघातापासून वाचवण्याचे काम करतो. ही कहाणी भारतासाठी अद्वितीय आहे – मृत्यूच्या पलीकडे जाऊन एका यंत्राला देव बनवणाऱ्या निष्ठेची कथा.

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

दरम्यान याचा व्हिडिओ @storyninjaah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही राजस्थानची खरी कहाणी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे! थोडा आदर दाखवा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी या ठिकाणी गेलो होतो, आम्ही प्रवास करत असताना ड्रायव्हरने सांगितले की मला त्या मंदिरात जायचे आहे आणि आम्हीही येणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी याबद्दलची एक घटना पाहिली होती, म्हणून जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मला ते आठवले आणि आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी त्याच्याकडे प्रार्थना केली. रात्रीची वेळ होती आणि आम्ही सुरक्षितपणे गंतव्यस्थानावर पोहोचलो. तो तिथे जणू संरक्षक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Om banna temple of rajasthan where bike is worship read the interesting story viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • rajasthan
  • temple
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
1

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण
2

भारतातील असे 5 मंदिर जे वर्षातून फक्त एकदाच खुले होतात; इथे होते प्रत्येक इच्छा पूर्ण

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral
3

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 
4

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.