नात्यात रोमान्स कसा टिकवाल (फोटो सौजन्य - iStock)
बराच काळ एकत्र राहिल्यानंतर आणि अनेक वर्षे लग्न लग्नाला झाल्यानंतर, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यातून रोमान्स अथवा प्रेम गायब होत आहे, तर या लेखातून आम्ही काही गोष्टी सांगत आहोत जे तुम्हाला तुमचे प्रेम परत मिळविण्यात मदत करतील. नात्यात, एकमेकांमधील प्रेम तितकेच महत्वाचे आहे जितके दोघांनाही श्वास घेण्याची आवश्यकता आहे.
जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात Romance चा मसाला नेहमीच टिकवून ठेवायचा असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे म्हणजे त्या व्यक्तीला कायम गृहीत धरत असाल तर तुम्ही सर्वात मोठी चूक करताय. इतरांना तुम्ही वेळ देता, चांगले बोलता, पण ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करताय असं सांगताय त्यांच्यासह रोमँटिक आयुष्य हे असायलाच हवे आणि त्यासाठी तुम्ही कितीही वर्ष एकत्र असाल तर परिस्थितीची कारणं देऊन यातून सुटका होऊ शकत नाही. परिस्थिती कशीही असो व्यक्तीची आयुष्यभर साथ हवी असेल आणि प्रेम असेल तर रोमान्स हा असायलचा हवा (फोटो सौजन्य – iStock)
I Love You म्हणाच
I Love You म्हणणे का आहे गरजेचे
तुम्हा दोघांमध्ये प्रेम राखून ठेवण्यासाठी I Love You या तीन जादुई शब्दाची खरंच गरज आहे आणि त्याचे खूप महत्त्वही आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल किंवा प्रेम व्यक्त करायचे असेल तुम्ही आपल्या जोडीदाराला नक्की आय लव्ह यू म्हणा. अगदी काहीही कारण नसताना तुम्ही त्यांना I Love You म्हणून तर पहा. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येईल आणि तुमच्या दोघांमधील आलेला दुरावा कमी होण्यासही मदत मिळेल. आपल्या जोडीदाराला सहवासाशिवाय काहीही नको असते आणि त्यात प्रेमाची कबुली मिळाली तर नात्याला अधिकच बहर येतो.
Relationship Tips: लग्नापूर्वी जोडीदारासह बोलून घ्या 4 गोष्टी, तरच टिकू शकतं नातं
लाँग ड्राईव्ह
एकांंतात वेळ घालवा
आपल्या जोडीदाराला अचानक लाँग ड्राईव्हवर घेऊन जा, कारण हे अत्यंत रोमँटिक आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला माहीत असेल की तुमच्या जोडीदाराचा मूड खराब आहे तेव्हा त्यांना अशा पद्धतीने सरप्राईज द्या. दिवसभरात कितीही काम असेल त्याबाबत एकमेकांशी बोला पण त्याहीपेक्षा अधिक तुम्ही घालवलेला वेळ आठवा आणि आपल्या नात्याला अधिक रोमँटिक बनवा. इतक्या वर्षातील सुखद आठवणींना उजाळा दिल्याने तुम्ही अधिक जवळ येता आणि नातंही मजबूत होते. कारण पुन्हा त्याच प्रेमाच्या आठवणीने तुमच्यातील जवळीकता वाढू शकते.
हसण्याची गरज
एकमेकांच्या आयुष्यात हसण्याचे कारण व्हा
तुम्ही सतत कामात, त्रासात आणि विचारात असता त्याचप्रमाणे तुमचा जोडीदारही असतोच. पण हे सर्व बाजूला ठेऊन एकमेकांसह असाल तेव्हा फक्त हसण्याची आणि एकमेकांना हसविण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एकमेकांसह हसाल तेव्हाच त्यात रोमान्स असेल. गंभीर राहणे हे चांगले लक्षण नाही. तुमचा जोडीदार हा तुमच्याकडे खूपच अपेक्षेने येत असतो. दिवसभराचा थकवा तुमच्या एका स्माईलने कमी होऊ शकतो हे लक्षात घ्या. हे तुम्ही इतक्या वर्षाच्या नात्यानंतर विसरला असाल तर रोमान्स वाढविण्यासाठी हे करून पहा.
जादू की झप्पी
रोमान्समध्ये मिठी महत्त्वाची
आपल्या जोडीदाराला अगदी घट्ट मिठी मारणं हेदेखील तुमच्या आयुष्यातील रोमान्स वाढवू शकतं. तुम्ही जेव्हा जेव्हा त्रासात असता किंवा भांडणं होतात मिठी मारणं हे खूपच महत्त्वाचं आहे कारण यातून तुम्हाला एकमेकांना तुमची किती गरज आहे हे जाणवतं. केवळ मिठीच नाही तर बराच वेळ मिठी मारून तुम्ही झोपण्यानेही रोमान्स वाढतो. बरेचदा आयुष्यात काय घडतंय माहीत नसतं, एखाद्यावेळी काहीच मार्ग सापडत नाही अशावेळी शांतपणे एकमेकांना मिठी मारा. अशावेळी काही बोलण्याचीही गरज नसते. त्या मिठीत रोमान्ससह एक आधारही असतो हे मात्र नक्की.
Kiss करण्याने रोमान्स फुलेल
Kiss करण्याने वाढते जवळीक दूर होतो दुरावा
नात्यात किस करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात पाहून त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करत किस केल्याने तुमच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होत जातो आणि रोमान्समध्ये ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही जर आपल्या जोडीदाराला किस करत नसाल तर भावनिकरित्या ते खूपच वाईट आहे. यामुळे नात्यातील दुरावा संपतो. Kiss केल्याने आणि स्पर्श झाल्याने अचानक दुरावा कमी होतो हे लक्षात घ्या. नात्याला अनेक वर्ष झाली असतानाही रोमान्स तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच तरूण ठेऊ शकता.