500 वर्षे जुना आयुर्वेदिक शरीराला आतून क्लीन करेल ड्रिंक जळजळही करेल दूर; बनण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
आपले शरीर हे कोणत्या यंत्राहून कमी नाही. आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहावं यासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव २४/७ काम करत असते. प्रत्येक अवयवायचे आपले असे कार्य असते जे ते नियमितपणे पूर्ण करत असतात. मूत्रपिंड आणि यकृत हे असे अवयव आहेत जे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करतात. पण यात तुम्ही अशी कोणती पाऊले उचलता का? आपले शरीर स्वछ ठेवण्यासाठी आपण काहीही करत नाही आणि याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ लागतो. अनेकदा मूत्रपिंड आणि यकृत शरीर आतून पूर्णपणे स्वछ करत नाहीत ज्यामुळे शरीराच्या आत घाण जमा होते जिला बाहेर काढणे फार महत्त्वाचे आहे.
आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा एका ड्रिंकविषयी माहिती सांगत आहोत जो तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करेल. यामुळे तुमच्या शरीरातील सर्व अशुद्धता निघून जाईल, ज्यामुळे अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत होईल आणि अनेक आजारांचा धोकाही टळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक ५०० वर्षे जुन्या आयुर्वेदिक घरगुती डिटॉक्स ड्रिंक आहे, शरीराचे शुद्धीकरण करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराच्या आतील संपूर्ण घाण निघून जाते आणि यामुळे शरीराचे कार्य सुधारण्यास मदत होते.
शरीराला आतून साफ करते हे ड्रिंक
सुप्रसिद्ध पोषणतज्ञ किरण कुकरेजा (Kiran Kukreja) यांनी अलीकडेच ५०० वर्ष जुना आयुर्वेदिक घरगुती उपाय शेअर केला आहे, जो इंटरनल ऑर्गन्सना शुद्ध करण्यास मदत करतो. यात इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात, ज्यामुळे उन्हाळ्यासाठी हे एक परफेक्ट ड्रिंक बनते. हे ड्रिंक म्हणजे बार्ली वाॅटर. बार्ली हे एक पौष्टिक धान्य आहे, जे जगभरात सर्वाधिक पिकवले जाते.
काय आहेत फायदे?
पोषणतज्ञांच्या मते, हे बार्ली धान्याचे पेय शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. त्याच वेळी, जर तुम्हाला किडनी स्टोन किंवा वारंवार यूटीआय होत असेल किंवा शरीरात जळजळ होत असेल तर हे पेय यावर फार गुणकारी आणि प्रभावी उपाय ठरू शकते. बार्लीच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक खनिजे देखील असतात, जे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करतात. म्हणून, उन्हाळ्यात बार्लीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
दीर्घकाळ जगायचंय? मग बटरला सोडा आणि आहारात या तेलाचा समावेश करा; Harvard Study ने स्पष्टच सांगितलं
बार्लीचे पाणी कसे बनवायचे (आयुर्वेदिक पद्धत)
यासाठी तुम्हाला दोन चमचे बार्लीचे दाणे आणि अडीच ते तीन कप पाणी घ्यावे लागेल. याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात तुळशीची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर खडे मीठ घालू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.