ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी नक्की वाचाच (फोटो सौजन्य - iStock)
बऱ्याच जणांनी घरातून काम करण्याच्या सवयीला मोडीत काढून आता दररोज कार्यालय गाठायला सुरुवात केली आहे. आठवड्याचे काही दिवस घरातून तर काही दिवस कार्यालयातून काम करण्याची पद्धतही आता हळूहळू बंद होऊ लागली आहे. आता प्रत्येकाने दररोज कार्यालय गाठणे बंधनकारक झाले आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शरीरातील बिघाडांबद्दल, सौम्य लक्षणांबद्दल अनेकदा दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये थेट गंभीर स्वरुपातील आजाराची बाधा होत आहे. गंभीर आजार बळावण्यापूर्वीच लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे असते. निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी आरोग्याची निगा राखण्यासाठी काही सवयींमध्ये बदल करावा लागतो. अमृतांजन कंपनीकडून याबाबत जागरूकता करण्यात आली आहे.
सततची पाठदुखी
अव्याहत कामामुळे होणारी पाठदुखी
तासनतास खुर्चीत बसून राहणे किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे या चुकीच्या सवयींमुळे कंबरदुखीचा त्रास वाढतो. बैठ्या कामकाजाच्या पद्धतीने पाठीचे दुखणे वाढते. कालांतराने पाठीच्या कण्याचा आकार बिघडायला सुरुवात होते. कित्येकदा पाठीला गंभीर आजार होण्याची शक्यता असते. पाठदुखीचा त्रास कमी करायचा असल्यास पाठीच्या खालच्या भागाला आधार देणाऱ्या एर्गोनॉमिक खुर्चीचा वापर करा. सतत खुर्चीवर बसून काम करायचे असेल, तर अशा वेळी प्रत्येक तासाच्या अंतराने काही मिनिटे ब्रेक घ्यावा. पाय मोकळे करा, पाठीचा व्यायाम करा. कंबरदुखी असह्य होत असल्यास अमृतांजन ॲडव्हान्स बॅक पेन रोल ऑन लावावे.
पाठीला आराम मिळेल. परिणामी, कामाला पुन्हा सुरुवात करता येईल. कामाचे तास जास्त असल्यास पाठदुखीचा त्रास असह्य झाल्यास हा रामबाण उपाय ठरतो. कामातून ब्रेक मिळाला की, अमृतांजन ॲडव्हान्स बॅक पेन रिलीफ लावून घ्यावे. विश्रातीनंतर काम करताना पाठदुखी पुन्हा डोके वर काढत नाही.
डोळ्यांवर ताण येणे, डोकेदुखीचा त्रास
डोळ्यांवर सतत ताण येतो
कामकाजाच्या व्यापात सतत डेस्कसमोर कॉम्प्युटर स्क्रीनवर काम केल्याने अनेकांना डोकेदुखी, डोळ्यात जळजळ होणे, कोरडेपणा व पाणी येते. सतत स्क्रीनवर काम केल्याने या आजारांना निमंत्रण मिळते. अंधुक प्रकाशात स्क्रीनवर काम करताना आसनव्यवस्थाही चुकीची असेल, तर आजारांमध्ये वाढ होते.
आजारांचा विळखा वाढण्याअगोदर तुम्ही स्क्रीनवर काम करण्याची वेळ आटोक्यात आणा. कॉम्प्युटर आणि डोळ्यांची रेषा समांतर राहील, अशा बैठकीत काम करा. दर वीस मिनिटांनी २० फूट अंतरावरील वस्तूंकडे पाहण्याचा सराव ठेवा. या अंतरावर किमान २० सेकंद पाहावे. डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.
हात आणि मनगटात सुन्नपणा किंवा मुंग्या येणे
तुम्हाला कामाच्या ठिकाणी हातात किंवा मनगटात सुन्नपणा किंवा मुंग्या येतात का ? संगणकावर सतत टायपिंग करताना मनगटाला ताण येऊन जखम होण्याची भीती असते. मनगटावर ताण येणे अनेकदा मनगटाच्या कार्पल टनेल सिंड्रोम या आजाराचे लक्षणही असू शकते. हा सुन्नपणा कमी करण्यासाठी व्यायाम करण्यावर भर द्यावा.
आता पाठ आणि कंबरेचं दुखणं होईल दूर; हे उपाय करून पाहा, नक्कीच मिळेल आराम
मान आणि खांदा कडक होणे
मान आणि खांद्याला त्रास होतो
डेस्कवर सतत झुकलेल्या अवस्थेत काम करत राहिल्यास मान आणि खांदा कडक होतो. फोनवर बोलतानाही मान आणि खांद्यावर ताण येतो. चुकीच्या पद्धतीने मानेजवळ फोन धरल्याने मानेसह खांदाही चुकीच्या पद्धतीने वाकला जातो. हळूहळू दोन्ही बाजू दुखायला सुरुवात होते. मान, तसेच पाठीच्या वरच्या भागांतील स्नायू ताणले जातात.
शरीरातील हा वाढता त्रास टाळण्यासाठी मोबाइल योग्यरीत्या पकडा. कान खांद्याच्या बाजूने वाकवून मोबाइलवर बोलणे टाळा. शरीराची रचना योग्य ठेवा. आपली मान आणि खांद्याचा दररोज व्यायाम करावा. व्यायामामुळे या भागांत तयार होणारा कणखरपणा, सततचे दुखणे कमी होते.
सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे
रात्रीची झोप पूर्ण केल्यानंतरही खराब हवेच्या संपर्कात आल्यास किंवा अंधुक प्रकाशात काम करत असाल, तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. खराब हवा किंवा अपुऱ्या नैसर्गिक प्रकाशामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते. परिणामी, तुमच्या दैनंदिन जीवनावर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
ताणतणावात वाढ होणे
शरीरावर प्रचंड ताण येणे
कार्यालयातील गोंधळ, सततचा गोंगाट आणि अस्त्यावस्थतेमुळेही तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. अनेकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागतो. माणूस सतत चिंताग्रस्त अवस्थेत राहतो. कार्यालयाची जागा स्वच्छ आणि योग्य व्यवस्थापनात राखली असेल, तर कर्मचाऱ्याला शांतपणे कामावर लक्ष देता येते.
कार्यालयात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होण्यासाठी भिंतीवर जीवनावश्यक मूल्ये जपणारी फलके लावा. कार्यालयात छोटी रोपे असल्यासही सकारात्मक ऊर्जा येते. कर्मचाऱ्यांनी तणाव व्यवस्थापनाची सवय लावायला हवी. विश्रांतीकरिता छोटा ब्रेक मिळाल्यावर खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करावा.
मेंटल हेल्थसाठी वर्क फ्रॉम होम पेक्षा चांगले आहे वर्क फ्रॉम ऑफिस, काय म्हणते स्टडी?
दुर्लक्ष करणे ठरेल महाग
कार्यालय हे तुमचे केवळ व्यावसायिक ठिकाण नसून, तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या शरीरातील बारीकसारीक तक्रारींकडे दुर्लक्ष करता कामा नये. शरीरातील आजारांबाबत माहिती देणारी लक्षणे वेळीच न ओळखल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात.
आजाराचे वेळीन निदान करुन उपचार घेणे गरजेचे आहे. यासह निरोगी आयुष्य जगण्यासाठी काही चांगल्या सवीयीही बाळगायला हव्यात. कार्यालयात सकारात्मक वातावरण असावे. या सवयींसह शरीरातील दुखण्यावर मात करण्यासाठी बाम लावण्यानेही आराम मिळतो. तुमचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. दैनंदिन आयुष्यातील ताणतणावावर मात करता येते. कार्यालयात योग्य व्यवस्थापन राहील, याकडे लक्ष द्या. तुमचे भविष्य सुरक्षित आणि अबाधित राहील.