Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम भारतामध्ये ८७ टक्के कुटुंबाचे आरोग्य डासांमुळे धोक्यात! सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती

भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. डास चावल्यानंतर ताप, अंग दुखणे, अशक्तपणा इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2025 | 01:00 PM
पश्चिम भारतामध्ये ८७ टक्के कुटुंबाचे आरोग्य डासांमुळे धोक्यात!

पश्चिम भारतामध्ये ८७ टक्के कुटुंबाचे आरोग्य डासांमुळे धोक्यात!

Follow Us
Close
Follow Us:

झोपेमधील अडथळे, विशेषतः मुलांना झोपेत येणारा व्यत्यय त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करत आहे अशी पश्चिम भारतातील 87% लोकांची खात्री आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या गुडनाईट या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँडने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. गुडनाईटने ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ या नावाने सादर केलेले हे अखिल भारतीय सर्वेक्षण YouGov या मार्केट रिसर्च फर्मकडून राबविण्यात आले. यात जनतेची मतं आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका याचे मूल्यमापन केले गेले. सर्वच भागांमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली. उत्तर, पूर्व भारतात 87% आणि दक्षिणेत 86% प्रतिसादकर्ते याच मताशी सहमत आहेत.

मुळांपासून कायमचा नष्ट होईल जुनाट मुळव्याध! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पोट वाटेल हलके

या अभ्यासानुसार, झोपेची कमतरता हा भारतीय घरांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. रोज रात्री प्रौढ लोक सुमारे 2 तास झोप गमावतात, तर मुलांची झोप त्यांना गरजेच्या असलेल्या वेळेपेक्षा जवळपास 4 तास कमी होते. ही सततची झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते, तणावाची पातळी वाढवते आणि विशेषतः मलेरिया व डेंग्यूसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांप्रती संवेदनशीलता वाढवते.

पश्चिम भारतातील प्रौढांमध्ये डास हे झोपेच्या व्यत्ययाचे एक प्रमुख कारण ठरले आहेत. विविध वयोगटांमध्ये सुमारे 61% लोकांनी डासांच्या प्रादुर्भावाला अस्वस्थ झोपेसाठी जबाबदार धरले आहे. मुलांमध्ये याचा परिणाम अधिक तीव्र असून, पालक सांगतात की डास चावणे व सतत त्यांची कानाशी होणारी भूणभूण हे झोपेमधील अडथळ्याचे प्रमुख कारण बनले आहे. हे आजार किंवा अभ्यासाच्या तणावापेक्षाही अधिक ठरते.

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अश्विन मूर्ती म्हणाले, “गुडनाईटचा ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ हा एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण अहवाल असून तो जनतेच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या धोक्याचे मूल्यमापन करतो. अशा उपक्रमांद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे भारतात डासांच्या समस्येबाबत जनजागृती वाढवणे, कुटुंबांना डासांचा अटकाव करण्यासाठी कृती करण्याकरता सक्षम बनवणे आणि देशासाठी परवडणाऱ्या पण नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे हे आहे. भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. आजारामुळे काम, शाळा, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपासून लांब राहावे लागते, सक्तीची रजा घ्यावी लागते. आरोग्यसेवेसाठी खर्च करावा लागतो आणि उत्पादकतेत घट होते. हे सर्व आर्थिक नुकसानीचे कारण ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपी टिकवण्यासाठी एक सक्षम आणि निरोगी कामकाज करणारा वर्ग आवश्यक असतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे हे प्रश्न वेळेवर सोडवणे.”

फक्त थकवा नाही, तर झोपेच्या अभावाचे परिणाम दूरगामी असतात. वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांसह अनेक संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.

गुडनाईटच्या अहवालावर भाष्य करताना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, “एक डास देखील प्राणघातक रोग पसरवण्याची क्षमता ठेवतो हे समजणे अत्यावश्यक आहे. हे लहानसे कानाशी भूणभूण करणारे कीटक डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक रोगांच्या फैलावामागचे धोकादायक कारण आहेत. ते रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल करतात. त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता वाढते. ही सततची भीती आपल्या आरोग्याला धोका पोहोचवते आणि निरोगी व उत्पादक जीवन जगण्याची क्षमता बाधित करते. डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती आपली आणि आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”

गुडघ्याच्या दुखापतींचेही आहेत प्रकार, तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन; वेळीच द्या लक्ष

गुडनाईटने फ्लॅश वेपोरायझर, अगरबत्त्या आणि अ‍ॅडव्हान्स फास्ट कार्ड यांसारख्या नाविन्यपूर्ण डास प्रतिबंधक उपाययोजना सादर करत एक दीर्घकालीन परंपरा जपली आहे. अलीकडच्या काळात बेकायदेशीर, अनियमित व चीनी घटक असलेल्या कीटकनाशकांमुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारांसोबत मिळून ‘Renofluthrin’ हे भारतातील पहिले देशी बनावटीचे व पेटंट केलेले मॉलिक्यूल विकसित केले आहे. डास नियंत्रणासाठी हे सर्वात प्रभावी लिक्विड वॅपोरायझर फॉर्म्युलेशन तयार करते. GCPL हे घरगुती कीटकनाशक क्षेत्रात आघाडीवर असून त्यांनी हे Renofluthrin फॉर्म्युलेशन त्यांच्या नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझरमध्ये सादर केले आहे. हे भारतातील सर्वात प्रभावी लिक्विड वेपोरायझर आहे. Renofluthrin वापरून तयार केलेले हे नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझर भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत लिक्विड वेपोरायझर फॉर्म्युलेशनच्या तुलनेत 2 पट अधिक प्रभावी आहे.
ok

Web Title: 87 percent of families in western india are at risk from mosquitoes survey reveals alarming information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • infections

संबंधित बातम्या

कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध
1

कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा शिंगाड्याचा समावेश, सुपरपॉवर देणारा पदार्थ नियमित खाल्ल्यास वाढेल शरीराची ताकद
2

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात करा शिंगाड्याचा समावेश, सुपरपॉवर देणारा पदार्थ नियमित खाल्ल्यास वाढेल शरीराची ताकद

कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध
3

कमी पाण्याचे सेवन करणे बेतू शकते जीवावर! शरीरात दिसून येतात पाण्याच्या कमतरतेची ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच व्हा सावध

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट
4

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.