मुळांपासून कायमचा नष्ट होईल जुनाट मुळव्याध!
दैनंदिन आहारात सतत मसालेदार किंवा तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघतले आणि पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. वारंवार अपचन, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात, पण असे न करता आहारात बदल करून आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.सतत जंक फूडचे सेवन करणे, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेकांना मूळव्याधीची समस्या उद्भवू लागली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
मूळव्याध झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. अपचन, पचनक्रिया बिघडणे, गॅस, ऍसिडिटी, अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचु लागतो. मूळव्याध होण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे पोट स्वच्छ होत नाही, ज्यामुळे मूळव्याध किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. आज आम्ही तुम्हाला मूळव्याधाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. जिऱ्याच्या पाण्यात असलेले गुणधर्म शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारून मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात जिऱ्याची पावडर मिक्स करून पिऊ शकता. यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच तुमचे पोट स्वच्छ होईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले ओव्याचे पाणी शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. ओव्याचे पाणी बनवण्यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा टाकून पाणी उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाण्याचे सेवन केल्यास पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते.
रोज रात्री जेवणानंतर नियमित अर्धा चमचा खसखस खाल्यास सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होईल आणि आराम मिळेल. याशिवाय तुम्ही रात्री झोपताना एक ग्लास दुधात खसखस टाकून पिऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हे गुणकारी पेय बद्धकोष्ठता आणि पोटासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरेल.