
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. हल्ली २० वर्ष वयोगातील मुलामुलींना हार्ट अटॅक येऊ मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. झोपेची कमतरता आणि जीवनशैलीतील बदलांच्या परिणामामुळे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या तासभर आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी छातीमध्ये वेदना होणे, जळजळ किंवा जडपणा वाटतो. याशिवाय छातीच्या मध्यभागी दडपण, जळजळ, चिमटे वेदना जाणवू लागतात. तसेच काहीवेळा ही समस्या मान, खांदा, पाठ किंवा हातापर्यंत सुद्धा पसरते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या प्रत्येक लक्षणांना ऍसिडिटी समजून दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे श्वास घेण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. याशिवाय चालताना, उभे राहताना किंवा विश्रांती घेतल्यानंतर सुद्धा खूप जास्त दम लागतो. हृदयावर आलेल्या अतिरिक्त तणावामुळे सतत दम लागणे किंवा लगेच थकल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे योग्य वेळी शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देऊन उपचार केल्यास आराम मिळेल.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हा थकवा जास्त वेळ शरीरात टिकून राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. शरीराला व्यवस्थित ऊर्जा न मिळाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर तणाव निर्माण होतो. हा तणाव कायम टिकून राहिल्यास थकवा, अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते.
आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय
थोडस चालून आल्यानंतर तर तुम्हाला लगेच घाम येत असेल तर ही सामान्य लक्षणे नसून हार्ट अटॅकची लक्षणे आहेत. हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी अचानक थंड घाम येणे, मळमळणे किंवा चक्कर इत्यादी लक्षणे दिसू लागतात.रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे वारंवार घाम येतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या वरील लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फ्रक्शन) तेव्हा येतो जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी एखादी मुख्य धमनी (कोरोनरी धमनी) पूर्णपणे किंवा अंशतः अवरोधित (ब्लॉक) होते. हा अडथळा सामान्यतः चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांपासून बनलेल्या प्लेकमुळे होतो.
हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे कोणती आहेत?
सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना किंवा अस्वस्थता (जसे की दाब, घट्टपणा किंवा जडपणा जाणवणे). इतर लक्षणांमध्ये हे समाविष्ट असू शकते:
हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कसा कमी करता येईल?
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून धोका कमी करता येतो: धूम्रपान आणि मद्यपान टाळासकस आणि संतुलित आहार घ्या (मीठ, साखर, प्रक्रिया केलेलेअन्न आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी करा)नियमित व्यायाम करानिरोगी वजन राखा, तणावाचे व्यवस्थापन करा.