आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक उपाय! थंडीमुळे घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी प्या औषधी काढा
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. थंडी आणि पावसाळ्यात प्रामुख्याने सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सर्दी झाल्यानंतर नाक चोंदणे, घशात वाढलेली खवखव, घसा दुखणे, इन्फेक्शन, ताप, थंडी, उलट्या, जुलाब इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बऱ्याचदा मेडिकलमधील पेनकिलर किंवा इतर गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार मेडिकलमधील गोळ्या खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. याशिवाय साथीच्या आजारांमुळे शरीरात कायमच थकवा जाणवू लागतो. नाक बंद होणे, सतत नाक झोंबणे इत्यादींमुळे रात्री व्यवस्थित झोप लागत नाही.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण वातावरणातील बदलांमुळे शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी होऊन जाते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. सर्दी खोकला वाढल्यानंतर औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आठवड्यातून एकदा आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून बनवलेला काढा प्यायल्यास संपूर्ण शरीराला भरमसाट फायदे होतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आजीबाईच्या बटव्यातील पदार्थांचा वापर करून आयुर्वेदिक काढा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी तुळशीचे पाने, पाणी, काळीमिरी, आल्याचा तुकडा, मध इतके साहित्य लागणार आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात हे पदार्थ सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा सकाळी चहा पिण्याऐवजी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन केल्यास चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत होईल. याशिवाय घशात वाढलेली खवखव थांबेल.
हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला
काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात किसून घेतलेलं आलं, काळीमिरी, तुळस पाने घालून व्यवस्थित उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. टोपातील काढा शिजल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात मध घालून सेवन करा. उपाशी पोटी औषधी काढ्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. आल्याच्या सेवनामुळे शरीरातील दाह कमी होतो.
FAQs (संबंधित प्रश्न)
हिवाळा ऋतूमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी उबदार कपडे घाला, संतुलित आहार घ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा (उदा. डिंक, अळीव लाडू, खजूर) आहारात समावेश करा, आणि भरपूर पाणी प्या (साधे किंवा कोमट). सर्दी, खोकला झाल्यास त्वरित उपाय करा.
हिवाळ्यात कोणता आहार घ्यावा, ज्यामुळे शरीर उबदार राहील?
शरीराला उबदार ठेवण्यासाठी आहारात गूळ, तिळगुळ, सुकामेवा, मध आणि कंदमुळे (उदा. रताळी, सुरण) यांचा समावेश करा. गरम सूप्स आणि हर्बल टी देखील उपयुक्त आहेत.
हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याची समस्या का वाढते?
हिवाळ्यात हवामानातील बदलांमुळे आणि रोगप्रतिकारक शक्ती कधीकधी कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लूचे प्रमाण वाढते.






