झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता
पराठा म्हटलं की आपल्याला लगेच आठवतात त्या स्वादिष्ट, तुपाने भाजलेल्या आणि गरमागरम पोळ्या ज्यात वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग भरलेलं असतं. पराठ्याची परंपरा उत्तर भारतात विशेष प्रसिद्ध आहे, मात्र आता तो सगळीकडेच आवडीने खाल्ला जातो. त्यातही अंडा पराठा हा एक अनोखा आणि पौष्टिक प्रकार आहे. सकाळचा नाश्ता असो वा रात्रीचं जेवण, अंडा पराठा पटकन होतो आणि पोटभर जेवणाची मजा देतो.
अंड्याचं प्रोटीन आणि मसाल्यांची झणझणीत चव यामुळे हा पराठा अतिशय रुचकर लागतो. मुलांना, तरुणांना तसेच मोठ्यांनाही हा पदार्थ खूप आवडतो. विशेष म्हणजे अंडा पराठा बाहेरच्या हॉटेलमध्ये लोकप्रिय असला तरी घरच्या घरी हा सोप्या पद्धतीने करता येतो. दही, लोणचं किंवा चटणीसोबत हा पराठा सर्व्ह केल्यास त्याची चव अधिकच वाढते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :
अंड्याच्या पराठ्यासोबत काय खावे?
अंड्याचा पराठा नुसताही खाता येतो. पण याची चव कोणत्याही चटणी आणि भाज्यांच्या सॅलडसोबत आणखीन वाढते.
अंड्याचा पराठा आरोग्यदायी आहे का?
होय, अंड्याचा पराठा एक निरोगी आणि पौष्टिक जेवण आहे. विशेषतः जेव्हा संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवले जाते आणि कमीत कमी तेल किंवा तूप घालून दिले जाते. हे अंड्यातील प्रथिने आणि संपूर्ण गव्हातील जटिल कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे, जे तृप्ति वाढवते आणि ऊर्जा प्रदान करते.