(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय बिर्याणीचे विविध प्रकार सर्वत्र लोकप्रिय आहेत. पण बिर्याणीच्या जगात अफगाणी चिकन बिर्याणीचा स्वाद वेगळाच आहे. ही बिर्याणी फारशी तिखट नसते, उलट क्रीमी, सौम्य मसालेदार आणि रुचकर अशी तिची खासियत आहे. अफगाणिस्तानच्या पाककलेत दही, काजू, क्रीम, सुगंधी मसाले आणि बासमती तांदळाचा उत्तम मेळ घालून पदार्थ अधिक समृद्ध बनवले जातात. त्याचाच परिणाम म्हणजे अफगाणी बिर्याणी! एक अशी डिश जी पाहुणचारासाठी किंवा खास प्रसंगासाठी अतिशय उत्तम मानली जाते.
चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी
या बिर्याणीमध्ये चिकन आधी दही, आलं-लसूण पेस्ट, काजूची पेस्ट आणि क्रीम यामध्ये मॅरिनेट केले जाते. त्यामुळे चिकन अत्यंत मऊसर व रसाळ होते. बिर्याणी शिजताना केशराचा सुवास आणि तुपाचा सुगंध घरभर दरवळतो. पारंपरिक मुघलई व अफगाणी खाद्यसंस्कृतीचा प्रभाव या डिशवर स्पष्टपणे दिसतो. अफगाणी चिकन बिर्याणीची चव तिखट खाणाऱ्यांसाठी साधी वाटली तरी तिचा नाजूक सुगंध, श्रीमंती आणि सौम्य मसाल्यांची जादू मन मोहवते. रायता, सलाड किंवा मिरचीचा थेचा सोबत ही बिर्याणी खाल्ल्यावर जेवणाचा अनुभव अधिकच खास बनतो. ही बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागतो, पण बनविल्यावर घरातील सगळ्यांचे कौतुक मिळणार हे नक्की!
साहित्य
कृती