Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल ‘मावा कचोरी’

Mawa Kachori Recipe : बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि गोड चवीची मावा कचोरी सर्वांच्याच आवडीची आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ही कचोरी तुम्ही घरी देखील एकदम सोप्या पद्धतीमध्ये तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 02:33 PM
Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल 'मावा कचोरी'

Recipe : जेवणानंतर काही गोड होऊन जाऊद्यात; घरी बनवा हलवाई स्टाईल 'मावा कचोरी'

Follow Us
Follow Us:
  • मावा कचोरी एक भारतीय मिठाई आहे.
  • माव्याच्या स्टफिंगने भरलेली ही कचोरी चवीला फार छान लागते.
  • चला घरच्या घरी मावा कचोरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.
भारतीय गोड पदार्थांमध्ये प्रत्येक राज्याची एक खास ओळख असते. राजस्थान म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती वाळवंटी भूमी, रंगीबेरंगी पोशाख, लोकसंगीत आणि तितकाच समृद्ध खाद्यसंस्कृतीचा वारसा. याच परंपरेतील एक अत्यंत लोकप्रिय आणि खास गोड पदार्थ म्हणजे मावा कचोरी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाळ आणि सुगंधी अशी ही कचोरी गोड खाण्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते.

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरीच बनवा ढाबा स्टाईल ‘चणा कोळीवाडा’, कुरकुरीत आणि खमंग चवीने सर्वच होतील खुश

मावा कचोरी विशेषतः सण-उत्सव, लग्नसमारंभ, दिवाळी, होळी किंवा पाहुण्यांसाठी खास बनवली जाते. मैदा, तूप, साखर, मावा आणि सुका मेवा यांच्या परिपूर्ण संगमामुळे या कचोरीला अप्रतिम चव येते. गरम गरम कचोरीवर साखरेचा पाक ओतला की तिची चव आणखीनच खुलते. एकदा का घरी बनवली की बाहेरची मावा कचोरी खाण्याची इच्छा होत नाही, इतकी ही घरगुती रेसिपी खास लागते. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने मावा कचोरी कशी बनवायची, अगदी बाजारात मिळणाऱ्या कचोरीसारखी… चला जाणून घेऊया मावा कचोरीची सोपी रेसिपी.

साहित्य

कचोरीसाठी पीठ:

  • मैदा – 1 कप
  • तूप – 2 टेबलस्पून
  • चिमूटभर मीठ
  • पाणी – गरजेनुसार
सारणासाठी:
  • मावा – 1 कप
  • साखर – ½ कप
  • काजू – 2 टेबलस्पून (चिरलेले)
  • बदाम – 2 टेबलस्पून (चिरलेले)
  • पिस्ते – 2 टेबलस्पून
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • किसलेले खोबरे – 1 टेबलस्पून (ऑप्शनल)
साखरेच्या पाकासाठी:
  • साखर – 1 कप
  • पाणी – ½ कप
  • केशर – थोडे धागे
  • वेलची पूड – ¼ टीस्पून
Recipe : सकाळचा नाश्ता बनवा खास; तुम्ही कधी सेट डोसा खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, मीठ आणि तूप एकत्र करून चांगले चोळा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि झाकून 20 मिनिटे ठेवा.
  • कढईत मावा मंद आचेवर परतून घ्या. त्यात साखर घालून मिक्स करा. साखर विरघळल्यावर सुका मेवा, वेलची
  • पूड आणि खोबरे घालून गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.
  • पीठाच्या लहान गोळ्या करून त्याची छोटी वाटी करा. त्यात माव्याचे सारण भरून कड नीट बंद करा.
  • कढईत तेल किंवा तूप गरम करून मध्यम आचेवर कचोर्‍या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • पातेल्यात साखर व पाणी उकळवून एकतारी पाक करा. त्यात केशर आणि वेलची पूड घाला.
  • तळलेल्या गरम कचोर्‍या साखरेच्या पाकात 2–3 मिनिटे बुडवून ठेवा.
  • मावा कचोरी गरम किंवा कोमट असतानाच सर्व्ह करा. वरून थोडे पिस्ते किंवा केशर घालून सजवा.

Web Title: Know how to make mawa kachori at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.