चरक ऋषींनी दिलेले डायबिटीसचे उपाय वाचाच (फोटो सौजन्य - iStocK)
मधुमेह हा एक धोकादायक सायलंट आजार आहे ज्यावर कायमचा इलाज नाही. याचा अर्थ असा की एकदा एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला की, त्याला निरोगी जीवन जगण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेहात, साखरेची पातळी वाढू लागते ज्यामुळे हळूहळू अनेक अवयवांचे नुकसान होऊ लागते. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे.
अर्थात, मधुमेहावर कोणताही इलाज नाही, परंतु महर्षी चरक यांनी त्यांच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मधुमेह हा एक गंभीर परंतु नियंत्रित करण्यायोग्य आजार असल्याचे वर्णन केले आहे. त्यांनी जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि औषधांद्वारे त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी 6 अत्यंत सोपे आणि परिणामकारक असे उपाय सांगितले असून डायबिटीस रूग्णांसाठी हा एक नक्कीच चांगला लेख ठरू शकतो. आजपासूनच तुम्ही या उपायांचा वापर करायला सुरू करू शकता (फोटो सौजन्य – iStock)
खाण्यावर नियंत्रण
जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे
मधुमेहात तिक्ता (कडू), कश्य (तुटपुंज) आणि कटू (तीक्ष्ण) रस असलेले पदार्थ फायदेशीर असतात. हे पदार्थ आयुर्वेदिक असून याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. आहारात गहू, ज्वारी, हरभरा, उडीद, कारले, कडुलिंबाची पाने, बेरी इत्यादींचा समावेश करा. कोमट पाण्यासोबत कमी प्रमाणात मध घ्या. तेलकट, गोड आणि जड अन्न टाळा. डायबिटीस असलेल्या रूग्णांनी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
व्यायाम अत्यंत गरजेचा
व्यायाम करायलाच हवा
महर्षी चरक यांनी म्हटले आहे की मधुमेहाच्या उपचारात व्यायाम करणे आवश्यक आहे. दररोज हलके शारीरिक व्यायाम करा. वेळेवर झोपणे आणि उठणे यासारखे नियमित दिनचर्या राखल्याने शरीराची पचनशक्ती संतुलित राहते. याशिवाय, मानसिक ताणापासून दूर रहा, ध्यान आणि योगाद्वारे मानसिक शांती मिळवा.
Myths Vs Facts: डायबिटीस रूग्णांसाठी रोज अंडे खाणे योग्य आहे का? काय आहे तथ्य
जांभूळ आणि मेथी दाण्याचा वापर
जांभूळ आणि मेथी दाण्याचा डायबिटीससाठी वापर करावा
जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहात प्रभावी मानली जाते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत १-२ ग्रॅम घ्या. मेथीचे दाणेदेखील प्रभावी आहेत. त्यांना रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी पाण्यासोबत सेवन करा. मात्र हे करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जांभूळ हे तर अत्यंत प्रभावी मानले जाते. त्याचे प्रमाण विचारून त्यानुसार सेवन करा
कारल्याचा प्रभावी रस
कारल्याचा रस वा चहा नियमित प्यावा
मधुमेहावर कारल्याचा आणि कडुलिंबाच्या पानांचा रस प्रभावी मानला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी १०-२० मिली कारल्याचा रस घेऊ शकता. याशिवाय तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा रस देखील पिऊ शकता. तुमची रक्तातील साखर पातळी अधिक प्रमाणात असल्यास कारल्याच्या रसाचा तुम्ही नक्की वापर करायला हवा. ही पातळी कमी होण्यास मदत मिळते
पंचकर्म
पंचकर्माची मदत घ्यावी
चरक संहितेत पंचकर्मासाठी अत्यंत महत्त्व आहे आणि मधुमेहासाठी बस्ती जो औषधीयुक्त एनीमा म्हणून ओळखला जातो आणि वमन ज्याला उपचारात्मक उलट्या म्हटले जाते यासारख्या पंचकर्म उपचारांचा उल्लेख आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून चयापचय संतुलित करण्यास मदत करतात आणि आपली प्रकृती चांगली राखून डायबिटीस कमी करण्यास याचा फायदा मिळतो
डायबिटीस रूग्णांनी वाचाच, केवळ गोडच नाही तर ‘या’ पदार्थांनीही वाढते ब्लड शुगर पातळी
सवयी बदला
चांगल्या सवयी लाऊन घ्या
जेवणानंतर फिरायला जाण्याची सवय लावा. विशेषतः मधुमेही रुग्णांनी दिवसा झोपू नका. याशिवाय, नियमितपणे स्वेदन अर्थात स्नान किंवा स्टीम बाथ घ्या. हे सर्व उपाय आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहेत आणि व्यक्तीच्या स्वभावानुसार म्हणजे तुमच्या वात, पित्त, कफ प्रकृतीनुसार हे बदलू शकतात. कोणताही उपाय करण्यापूर्वी, निश्चितच एखाद्या पात्र आयुर्वेदिक चिकित्सक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.