
सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश 'Scarambled Egg', अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी
बॉलीवूडचा “मिस्टर परफेक्शनिस्ट” म्हणून ओळखला जाणारा आमिर खान केवळ आपल्या अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या साध्या आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातही तो आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देतो. फिटनेस आणि पौष्टिक आहार यांचा उत्तम समतोल राखणारा आमिर दिवसाची सुरुवात हलक्या पण प्रोटीनयुक्त न्याहारीने करतो. त्याच्या आवडत्या न्याहारींपैकी एक म्हणजे “स्क्रॅम्बल्ड एग” एक सोपी, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिश.
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा
आमिरच्या मते, दिवसाची सुरुवात जर पौष्टिक आणि हलक्या जेवणाने केली, तर पूर्ण दिवसात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे तो साध्या घटकांपासून बनवलेली पण चवदार स्क्रॅम्बल्ड एग रेसिपी आवडीने खातो. ही रेसिपी प्रोटीनने समृद्ध, पोटभरीची आणि त्वरीत बनणारी आहे. विशेष म्हणजे यात तेलाचा वापर कमी आणि चवीला खास मसाल्यांचा हलकासा स्पर्श आहे, ज्यामुळे ती डिश हेल्दी राहते पण चवदारही लागते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
आमिर खान आपल्या डाएटमध्ये तळकट किंवा मसालेदार पदार्थ टाळतो. त्यामुळे त्याच्या या स्क्रॅम्बल्ड एग रेसिपीत साधेपणा असूनही चवीत एक खास आकर्षण आहे. प्रोटीनयुक्त, हलका आणि पटकन बनणारा हा नाश्ता प्रत्येकासाठी उत्तम पर्याय आहे.