
वयाच्या ८९ व्या वर्षी अभिनेता धर्मेंद्र यांनी घेतला जगाचा निरोप, आरोग्यासंबंधित 'या' गंभीर आजाराने होते त्रस्त
हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेले व्यक्तिमत्व जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीमधील ते गाजलेले अभिनेते होते. मागील बऱ्याच दिवसांपासून धर्मेंद्र गंभीर आजाराने त्रस्त होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखरेचा श्वास घेतला. मागील ११ दिवसांपासून धर्मेंद्र आयसीयूमध्ये आजाराशी दीर्घकाळ झुंज देत आहेत. श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्यामुळे काल रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागील सहा दशकांहून अधिककाळ ते अभिनाशी जोडले गेले होते. (फोटो सौजन्य – pinterest)
मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांना श्वसनाच्या समस्या उद्भवू लागल्या होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी बॉलिवूड अभिनेते सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, अमिषा पटेल, जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली होती. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. जास्त वय झाल्यानंतर प्रामुख्याने श्वसनाच्या समस्या उद्भवतात. त्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे न्यूमोनिया. न्यूमोनिया हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांमध्ये जळजळ होते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन साठवताना अनेक अडचणी निर्माण होतात.
श्वसनाच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराला ऑक्सिजन व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्यामुळे श्वास घेताना आणि सोडताना अनेक अडथळे निर्माण होतात. वय वाढल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. यामुळे उपचार करताना गुंतागुंत निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. न्यूमोनिया झाल्यानंतर ब्राँकायटिस आणि सीओपीडीमुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. ब्राँकायटिसमुळे श्वसनमार्गात जळजळ होऊन श्लेष्मा जमा होतो, ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते.