Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…

Cerebral palsy in Adults: सेरेब्रल पाल्सी हा केवळ लहान मुलांपुरता मर्यादित नसून बालपणात सुरू झालेल्या या स्थितीचा परिणाम प्रौढावस्थेतही जाणवू शकतो. स्नायू आखडणे, अशक्तपणा, वेदना, थकवा, शरीराचा तोल जाणे आणि हालचालींमध्ये अडचणी अशा समस्या प्रौढांमध्ये दिसू शकतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 06, 2026 | 05:46 PM
Cerebral palsy in Adults:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Cerebral palsy in Adults:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सेरेब्रल पाल्सीची सुरुवात बालपणात होते, पण परिणाम प्रौढावस्थेतही जाणवू शकतो.
  • मूळ मेंदूची इजा वाढत नसली तरी स्नायू, वेदना आणि थकव्याच्या समस्या बदलू शकतात.
  • सेरेब्रल पाल्सी असलेल्या अनेक प्रौढांना शिक्षण, नोकरी आणि स्वतंत्र जीवन शक्य आहे.
सेरेब्रल पाल्सी म्हटले की हा आजार केवळ लहान मुलांपुरताच मर्यादित आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, बालपणात सुरू झालेल्या या आजाराचा परिणाम प्रौढावस्थेतही जाणवू शकतो. स्नायू आखडणे, वेदना जाणवणे, थकवा, हालचालींसंबंधी समस्या अशा समस्या वय वाढताना जाणवू शकतात. मात्र, याचा अर्थ व्यक्तीचे स्वावलंबन कमी होईल किंवा उपचारांची गरज संपली, असा नाही. प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे चार सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता डॉ. नीरज जैन, वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट, न्यूईरा हॉस्पिटल्स, वाशी, नवी मुंबई यांनी सांगितली आहे. चला जाणून घेऊया.. Cerebral palsy in Adults:

सेरेब्रल पाल्सी हा मेंदूचा विकास सुरू असताना मेंदूला झालेली इजा किंवा मेंदूच्या विकासातील अडथळ्यामुळे होतो. त्यामुळे हालचाली, स्नायूंचा ताण, शरीराचा तोल आणि समन्वय यावर परिणाम होऊ शकतो. अकाली जन्म, काही ठराविक संसर्ग, मेंदूचा झटका, मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे किंवा इतर काही मज्जासंस्थेशी संबंधित समस्या यास कारणीभूत ठरू शकतात. काही रुग्णांमध्ये नेमके कारण समजू शकत नाही.

सेरेब्रल पाल्सीची सुरुवात बालपणातच होते, मात्र त्याचा परिणाम प्रौढावस्थेतही जाणवू शकतो. प्रौढांमध्ये स्नायू आखडणे, स्नायूंमधील अशक्तपणा, हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात अडचण, शरीराचा तोल जाणे, वेदना आणि चालण्यास किंवा इतर हालचाली करण्यास त्रास होऊ शकतो. हे आहेत सेरेब्रल पाल्सीबाबतचे चार गैरसमज

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

गैरसमज १ : मेंदूची इजा वाढत गेल्यामुळे सेरेब्रल पाल्सीची तीव्रता वाढते

वास्तविकता : सेरेब्रल पाल्सीला कारणीभूत ठरलेली मूळ मेंदूची इजा कालांतराने वाढत जात नाही. मात्र, वय वाढताना स्नायू आखडणे, वेदना होणे, अशक्तपणा, थकवा आणि सांध्यांशी संबंधित समस्या वाढू अथवा बदलू शकतात. त्यामुळे गरजेनुसार नियमित वैद्यकीय उपचार आणि तपासणी करणे आवश्यक आहे.

गैरसमज २ : सेरेब्रल पाल्सी असलेली व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतंत्र जीवन जगू शकत नाही

वास्तविकता : अनेक प्रौढ व्यक्ती सेरेब्रल पाल्सी असूनही चांगले शिक्षण घेतात, नोकरी करतात, नातेसंबंध सांभाळतात आणि स्वतंत्रपणे आनंदी जीवन जगतात. प्रत्येक व्यक्तीची हालचाल करण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना दैनंदिन कामांसाठी सहाय्यक उपकरणे किंवा इतर मदतीची गरज भासू शकते.

गैरसमज ३ : वेदना आणि सततचा थकवा हा वाढत्या वयाचा सामान्य भाग आहे

वास्तविकता : वेदना, थकवा किंवा स्नायूंचा वाढलेला ताण याकडे दुर्लक्ष करू नये. शरीरातील स्नायूंच्या ताणातील बदल, शरीराची ठेवण, हालचाली करण्याची पद्धत किंवा शारीरिक हालचाल कमी होणे यामुळेही या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांची न्यूरोलॉजिस्टकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

गैरसमज ४ : प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीवर कोणतेही उपचार करता येत नाहीत

वास्तविकता : उपचार केवळ बालपणापुरते मर्यादित नसतात. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी औषधे, वेदनांवर उपचार आणि हालचालींसाठी सहाय्यक उपकरणे यामुळे प्रौढ व्यक्तींची कार्यक्षमता आणि जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

सेरेब्रल पाल्सीची सुरुवात बालपणात होत असली तरी ती व्यक्ती १८ वर्षांची झाल्यानंतर त्यासाठी वैद्यकीय उपचार थांबवू नये. नियमित आरोग्य तपासणीमुळे हालचालींमधील बदल, स्नायूंमधील तणाव, वेदना आणि थकवा यांसारख्या समस्या वेळीच लक्षात येऊ शकतात. योग्य वेळी उपचार आणि आवश्यक मदत मिळाल्यास सेरेब्रल पाल्सी असलेल्या प्रौढ व्यक्तींना सक्रिय आणि स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Adult cerebral palsy 4 common myths and reality rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • lifestlye tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
1

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास
2

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
3

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
4

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.