
चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा 'हा' प्रभावी लेप
चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय?
त्वचा उजळदार करण्यासाठी कोणता लेप लावावा?
त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय?
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरूम येणे, त्वचा खूप जास्त टॅन होणे, काळे डाग, वांग इत्यादी अनेक त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहरा खूप जास्त निस्तेज आणि थकल्यासारखा वाटतो. दीर्घकाळ चुकीच्या स्किन केअरचा वापर, सतत केल्या जाणाऱ्या केमिकल स्किन ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. तसेच पचनक्रिया बिघडल्यानंतर चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात. चेहऱ्यावर पिंपल्स येऊन त्यात पाणी किंवा पू तयार होऊन रक्त येते. त्यामुळे कधीच त्वचेवर आलेले पिंपल्स हाताने किंवा नखाने कोचून फोडू नये. बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे काळे डाग काही केल्या निघून जात नाही. वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशनचा वापर करून सुद्धा त्वचेवर आलेले डाग जात नाही.(फोटो सौजन्य – istock)
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ
चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्य कमी झाल्यानंतर महिला खूप काही करतात. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीट्मेंटमुळे वाढत्या वयात त्वचा खूप जास्त निस्तेज आणि सुरकुत्या येऊन विचित्र दिसते. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून लेप तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा लेप त्वचा आतून उजळदार आणि सुंदर करण्यास मदत करते. हा लेप १५ दिवस नियमित लावल्यास पिगमेंटेशन, ॲक्ने, पिंपल्स कमी होऊन त्वचा खूप जास्त सुंदर आणि उजळदार दिसते. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी हा उपाय नक्की करून पहा.
पिगमेंटेशन किंवा पिंपल्समुळे आलेले काळे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा रस आणि बटाट्याचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. या दोन्ही पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय टोमॅटो आणि बटाटा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जातात. या दोन्ही पदार्थांचा वापर नियमित त्वचेवर केल्यास काही दिवसांमध्ये सकारात्मक परिणाम चेहऱ्यावर दिसून येतील. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचा रस, बटाट्याचा रस, कॉफी पावडर, दही आणि चमचाभर मध मिक्स करून पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात थोडस तांदळाचे पीठ मिक्स करा. पातळ पेस्ट तयार केल्यानंतर सगळ्यात शेवटी विटामिन ई कँप्सूल मिक्स करून घ्या. तयार केलेला लेप संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.
मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन, धूळ, माती इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत होईल. लेप लावून १५ मिनिटं झाल्यानंतर हाताने चोळून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा लेप आठवडाभर किंवा महिनाभर नियमित लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होऊन त्वचा खूप जास्त सुंदर आणि उजळदार दिसेल. घरगुती पदार्थांपासून बनवलेला लेप त्वचेला पोषण देतो. यामुळे त्वचेचे कोणतेही गंभीर नुकसान होत नाही. तांदळाचे पीठ आणि कॉफी पावडर चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यास मदत करतात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो.