शरीरावर घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ
घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
त्वचेवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय करावे?
अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावेत?
वर्षाच्या बाराही महिने शरीराला घाम येतो. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण काहीवेळा घामाच्या दुर्गंधीचा वास सहन होत नाही. सतत येणाऱ्या घामामुळे अंगावर घाणीचे चिकट थर तसेच साचून राहतात. यामुळे अंगाला खाज येणे, अंगावर लाल रॅश किंवा घामाची दुर्गंधी वाढून त्वचेला हानी पोहचते. थंडीच्या दिवसांमध्ये सगळेच गरम पाण्याची अंघोळ करतात. कारण थंड वातावरणामुळे हवेत खूप जास्त गारवा असतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ केल्यास सर्दी खोकला किंवा इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत गरम किंवा कोमट पाण्याची अंघोळ केली जाते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर लाल रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात हे पदार्थ मिक्स करावेत. नैसर्गिक पदार्थांच्या वापरामुळे त्वचा कायमच स्वच्छ राहते.(फोटो सौजन्य – istock)
लग्नापूर्वी उजळ त्वचा हवीये, ‘अशी’ घ्या तुमच्या त्वचेची काळजी, नवऱ्याची नजरच हटणार नाही
मागील अनेक वर्षांपासून शरीरावर जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकली जातात. कडुलिंबाची पाने नैसर्गिक जंतुनाशक मानली जातात. अंघोळीचे पाणी गरम करताना त्यात भरपूर कडुलिंबाची पाने घालून गरम करावे. त्यानंतर गरम केलेले पाणी अंघोळीसाठी वापरावे. यामुळे शरीरावर येणारी रॅश, खाज किंवा लालसरपणा कमी होऊन त्वचा स्वच्छ होईल. तसेच कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरावर जॅमम झालेले बॅक्टरीया नष्ट होतील.
अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराची स्वच्छतासुद्धा होते. शरीराला येणारी खाज कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. याशिवाय जास्त थकल्यानंतर किंवा मानसिक तणाव वाढल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकावे. जास्त मीठ घालू नये. चमचाभर मीठ पुरेसे ठरेल.
मानसिक ताण कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाब पाणी टाकावे. यामुळे त्वचा कोमल होते. तसेच लिंबाची साल किंवा संत्र्याची साल सुद्धा तुम्ही वापरू शकता. यामुळे शरीरावर बॅक्टरीया कमी होतात आणि त्वचा अतिशय स्वच्छ होते. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाची किंवा संत्र्याची साल अतिशय प्रभावी ठरेल.
Ans: थंडीच्या दिवसात कोमट पाण्याचा वापर करावा, पण खूप गरम पाणी वापरू नये.
Ans: जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते आणि ती कोरडी पडू शकते.






