Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळपायांमध्ये सतत आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा ‘हा’ औषधी पदार्थ

शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तळपायांमध्ये आग होण्यास सुरुवात होते. तळपायांमध्ये वाढलेली आग कमी करण्यासाठी पायांना मेहंदी लावावी. याशिवाय मेंहदी पायांना लावल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2025 | 05:30 AM
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा 'हा' औषधी पदार्थ

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा 'हा' औषधी पदार्थ

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोजच्या आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर कायम थंड राहतं. बऱ्याचदा शरीराची प्रक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)

गर्भधारणा राहिल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, घरीच ओळख Good News

उन्हाळा वाढल्यानंतर बऱ्याचदा तळपायांमध्ये आग होते. तळपायांमध्ये वाढलेली जळजळ काहीवेळा अतिशय तीव्र होऊन जाते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर सगळ्यात आधी तळपायांमध्ये जळजळ होते आणि पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी पायांना मेंहदी लावावी. पायांना मेहंदी लावल्यामुळे तळपायांमध्ये होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी होऊन जाते. शरीराचे संतुलन राखण्यासाठी मेहेंदी लावावी. आज आम्ही तुम्हाला तळपायांना मेहेंदी लावल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

शरीरातील उष्णता कमी होते:

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तळपायांना किंवा हातानं तुम्ही मेहेंदी लावू शकता. यामुळे मेहंदी शरीरात वाढलेली सर्व उष्णता बाहेर काढून टाकते आणि शरीर निरोगी राहते. मेंहदी त्वचेमधून थेट स्नायूंवर आणि नाड्यांवर परिणाम करते ज्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. मेहंदी लावल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

झोपेची गुणवत्ता सुधारते:

झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना मेंहदी लावावी. मेहंदी लावल्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागते. शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. पायांमधील थंड गुणधर्म मेंदूपर्यंत पोहचतात. त्यामुळे मेंदू शांत होतो. चांगल्या झोपेसाठी मेंदू शांत असणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात कायम राहालं फ्रेश आणि निरोगी! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन,अशक्तपणापासून मिळेल आराम

थकवा आणि पायांची सूज कमी होते:

बऱ्याचदा हातापायांना अचानक सूज येते. हातापायांना सूज आल्यानंतर किंवा थकवा जाणवू लागल्यास तळपायांना मेहंदी लावावी. यामुळे जळजळ कमी होऊन वेदनांपासून आराम मिळेल. याशिवाय मेहंदीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करून स्नायूंना आराम देतात. याशिवाय पायांना हलके वाटू लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply this medicine to the soles of your feet regularly to reduce the increased heat in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
1

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
2

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
3

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.