दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचे नियमित करा सेवन
एप्रिल मे महिन्यात सगळीकडेच कडक उन्हाळा असतो. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. वाढत्या सूर्यप्रकाशामुळे शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय काहीवेळा शरीर पूर्णपणे डिहायड्रेट होऊन जाते. त्यामुळे शरीर कमकुवत होऊन जाते. चुकीचा आहार, शरीरात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराची पचनक्रिया काहीवेळा बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या उन्हाळ्यात शरीर कायम हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला पाण्याची जास्त आवश्यक असते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात सतत काहींना काही बदल होऊन जातात. त्यामुळे नियमित दुपारच्या वेळी किंवा इतर वेळी जेवणात दही, ताक, नारळ पाणी आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात तुम्ही काकडी, टरबूज, लाकूड सफरचंद, काकडी, पपई इत्यादी फळांचे जास्त प्रमाणात सेवन करावे. या भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास तुम्ही कायम फ्रेश आणि तरुण रराहालं.
उन्हाळ्यात सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील पाणी घामावाटे आणि लघवीवाटे निघून जाते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात नारळ पाणी आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे. आहारात जास्त पाणी आणि पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही कलिंगड, काकडी, पपई, टरबूज, ताडगोळे किंवा इतर थंड फळांचे सेवन करू शकता.
काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. काकडीमध्ये 90 टक्के पाणी आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात काकडीचे भरपूर सेवन करावे. काकडीपासून तुम्ही सॅलड, रायता किंवा काकडीचे सरबत बनवून सुद्धा पिऊ शकता. याशिवाय यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, मीठ, फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारे अनेक गुणधर्म आढळून येतात.