Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

किडनीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर पायांना सूज येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 08:24 AM
हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

Follow Us
Close
Follow Us:

किडनी खराब होण्याची कारणे?
किडनीचे आजार झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
नियमित किती लिटर पाणी प्यावे?

शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य कायमच सक्रिय असणे फार गरजेचे आहे. अन्यथा शरीरात असंख्य बदल दिसून येतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित छोट्या मोठ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण हीच लक्षणे कालांतराने मोठी होतात आणि आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. किडनी हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणे, शरीरातील सोडियम बाहेर काढून टाकणे, लघवीवाटे विषारी घटक बाहेर काढून टाकणे यांसारखी अनेक महत्वाची कामे किडनी करते. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे किडनीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयात शरीराला किडनीच्या आजारांची लागण होऊ लागली आहे. शारीरिक हालचालींचा अभाव आणि पाण्याची कमतरता किडनीचे आजार होण्यास कारणीभूत ठरते.(फोटो सौजन्य – istock)

आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाय सुजल्यासारखे वाटते. पण कामाच्या तणावामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे पाय सुजले असावेत, असे अनेकांना वाटते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांना सूज येते. किडनी रक्तातील सोडियमची पातळी बाहेर काढून टाकते. रक्तातील हेच विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. पण या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे हात-पाय थरथरणे किंवा सूज येणे यांसारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

किडनी रक्तातील जास्त प्रमाणातील सोडियमचे प्रमाण बाहेर काढून न टाकल्यास हे पाणी शरीराच्या खालच्या भागात जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे पाय, घोटा आणि तळपायांवर सूज येते. याशिवाय पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. तुमच्या पायांना वारंवार जर सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. अन्यथा गंभीर आजार होऊ शकतात.

रक्तामधील विषारी घटक दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे मज्जासंस्थेवर जास्तीचा ताण येतो. यामुळे स्नायूंमध्ये कमजोरी जाणवते. काहीवेळा हातपाय थरथरणे, पायांना सूज येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. वारंवार लघवीला येणे, लघवीचा रंग गडद होणे किंवा लघवीतून फेस येणे ही किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे आहेत. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये लघवीतून रक्त सुद्धा येते. तुमच्या डोळ्यांखाली जर वारंवार सूज येत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

रक्तातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा त्वचेला खाज येण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाण्याच्या सेवनामुळे किडनीमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. याशिवाय आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास किडनीवर अतिरिक्त तणाव येतो. त्यामुळे आहारात अतिशय कमी मीठ खावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी खराब होण्याची लक्षणे?

    Ans: फेसयुक्त लघवी, वारंवार लघवी होणे किंवा लघवी कमी होणे.

  • Que: किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?

    Ans: अनियंत्रित मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही किडनी निकामी होण्याची प्रमुख कारणे आहेत.

  • Que: किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: दररोज पुरेसे पाणी पिणे, आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे, धूम्रपान टाळणे, आणि रक्तातील साखर व रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Are the limbs permanently swollen then the danger of this serious disease may arise neglecting it will be fatal for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा धोका? जाणून घ्या यामागील कारणे आणि स्टोन नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय
1

उन्हाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा धोका? जाणून घ्या यामागील कारणे आणि स्टोन नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.