
चेहऱ्यावरील वांग आणि काळ्या डागांमुळे हैराण झाला आहात? 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, चेहऱ्यावर येईल ग्लो
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी उपाय?
वांग येण्याची कारणे?
तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा?
Skin Care Tips: वय वाढल्यानंतर त्वचेच्या समस्या सुद्धा वाढू लागतात. चेहऱ्यावर वांग येणे, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या येऊन त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम थेट शरीर आणि चेहऱ्यावर सुद्धा दिसून येतो. यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये मोहरीच्या आकारातील बारीक बारीक पिंपल्स येतात. त्यानंतर हेच पिंपल्स मोठे होऊन त्वचा निस्तेज करून टाकतात. नाकावर, गालावर, कपाळावर काळे डाग वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर सुद्धा त्वचेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे चेहऱ्यावर वांग आणि पिगमेंटेशन वाढून त्वचा काळपट दिसू लागते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कायमच महागडे प्रॉडक्ट, महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण त्याऐवजी घरगुती उपाय करून चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालावावेत. यामुळे त्वचेवर आलेले जुनाट वांग, पिगमेंटेशन आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होते. सगळ्यांचं आपली त्वचा कायमच सुंदर आणि डागविरहित हवी असते. पण त्यासाठी केवळ स्किन केअरसोबतच भरपूर पाणी आणि आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात असंख्य बदल होत असतात. गरोदरपणा, ब्रेस्ट फिडिंग यादरम्यान शरीरातले हार्मोन्स खूप जास्त बदलतात. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मोठे मोठे काळे डाग येतात. वांग आल्यानंतर डाग घालवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. याशिवाय कडक उन्हामुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. शरीरातील विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर काळे डाग येऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. वारंवार तुमच्या त्वचेवर वांग किंवा पिगमेंटेशन येऊन त्वचा डल वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
वांग घालवण्यासाठी सर्वप्रथम, खलबत्यामध्ये कडुलिंबाची पावडर आणि काकडीचे तुकडे घालून बारीक कुटून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कपड्यात ओतून त्यातून रस काढा आणि तुरटीच्या मिश्रणात मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने वांग आलेल्या ठिकाणी मिश्रण लावून १० ते १५ मिनिटं चेहऱ्यावर तसेच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करणे फार आवश्यक आहे.
Ans: तुरटीमध्ये त्वचेला तात्पुरते टाईटनिंग आणि स्वच्छ वाटण्यास मदत करणारे गुणधर्म असू शकतात; मात्र काळे डाग किंवा वांग कायमचे कमी करण्यासाठी तुरटी प्रभावी असल्याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
Ans: तुरटी त्वचेला कोरडी किंवा चिडचिड करणारी ठरू शकते. त्यामुळे थेट लावण्यापेक्षा त्वचेला सुरक्षित पर्याय वापरणे आणि आधी पॅच टेस्ट करणे योग्य ठरते.
Ans: तुरटीमुळे त्वचा तात्पुरती घट्ट किंवा स्वच्छ वाटू शकते, त्यामुळे ग्लो दिसत असल्याचा भास होऊ शकतो. मात्र दीर्घकाळ त्वचा उजळण्याचा हमखास परिणाम अपेक्षित ठेवू नये.