
सैल त्वचा होईल टाईट! गोकर्णाच्या फुलांपासून घरीच तयार करा नाईट क्रीम, चेहऱ्यावरील काळे डाग- सुरकुत्या होतील गायब
Skin Care: चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर केला जातो तर कधी स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर झाल्यानंतर तरुण वयातच त्वचा सैल पडते. सुरकुत्या किंवा सैल पडलेली त्वचा पुन्हा एकदा चांगली करण्यासाठी बोटॉक्स किंवा फिलर्ससारख्या महागड्या ट्रीट्मेंट करून घेतल्या जातात. पण त्याऐवजी गोकर्णाच्या फुलांचा वापर करून झटपट तुम्ही नाईट क्रीम तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – AI)
तयार केलेल्या मिश्रणाला थिकनेस आल्यानंतर काचेच्या हवाबंद डब्यात क्रीम भरून ठेवा. तयार केलेली क्रीम नियमित रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि सुरकुत्या, सैल पडलेली त्वचा घट्ट होईल. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेल्या नाईट क्रीमचा वापर करावा.
Ans: गोकर्णाच्या फुलांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेली संयुगे आढळतात.
Ans: गोकर्णाच्या फुलांमुळे काळे डाग कमी होतात, हे सिद्ध करणारे पुरेसे मानवी अभ्यास उपलब्ध नाहीत. डाग कमी करण्यासाठी दररोज ब्रॉड-स्पेक्ट्रम SPF 30 किंवा त्याहून अधिक सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.
Ans: मॉइश्चरायझरमुळे त्वचा मऊ आणि तात्पुरती अधिक भरलेली दिसू शकते. मात्र, घरगुती क्रीममुळे सैल त्वचा कायमस्वरूपी टाईट होते, याचा ठोस पुरावा नाही.