
Avocado Day : चवीला पौष्टिकतेची जोड; ॲव्होकॅडोपासून बनवा हा हेल्दी-टेस्टी सकाळचा नाश्ता; शेफ शमसुल वाहिदने शेअर केलीये रेसिपी
आज 31 जुलै, हा दिवस नॅशनल ॲव्होकॅडो डे म्हणून साजरा केला जातो. ॲव्होकॅडो ही एक भाजी असून आपल्या आरोग्यासाठी ती फार पौष्टिक आणि फायद्याची आहे. अशात या दिवशी ॲव्होकॅडोपासून तयार केल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांचा चविष्ट आस्वाद घेतला जातो. तुम्हाला जर ॲव्होकॅडोपासून कोणते पदार्थ बनवावे हे सुचत नसेल किंवा याविषयी काही माहिती नसेल तर चिंता करू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी आज एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही घरीच अगदी सहज, सोपी आणि झटपट तयार करू शकता.
ही रेसिपी ॲव्होकॅडोपासून तयार केली जाणार असल्याने ती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. मुख्य म्हणजे शेफ शम्सुल वाहिद यांनी ही रेसिपी शेअर केली आहे जी त्यांच्या SOCIAL Cafe मधील एक लोकप्रिय डिश आहे. ही रेसिपी ॲव्होकॅडो चीज आणि ब्रिओश ब्रेडसह तयार होते. चला तर मग लगेच जाणून घेऊया याची रेसिपी!
स्क्रॅम्बल्ड एग्ज:
अंडी फोडून फेटून घ्या. कढईत एक चमचा बटर गरम करा. त्यात अंडी घालून हळूवार हलवा. नंतर त्यात क्रीम चीज, ग्राना पडानो चीज आणि थोडं मीठ घालून मिक्स करा. अंडी जरा सॉफ्ट आणि क्रीमी असतानाच गॅस बंद करा. ओव्हरकुक करू नका, कारण याची खासियत म्हणजे त्यातील क्रीमी टेक्स्चर.
गोल्डन ब्रिओश:
ब्रिओश ब्रेड १.५ इंच जाड काप करा. प्रत्येक स्लाइसमध्ये मध्ये एक पोकळी तयार करा – जसं सॅंडविचसाठी करतो. उरलेलं बटर पॅनमध्ये गरम करून ब्रेड दोन्ही बाजूंनी खरपूस आणि सोनेरी होईपर्यंत टोस्ट करा.
अॅवोकाडो प्रेप:
अॅवोकाडो सोलून, बियाणं काढून, स्लाइस करा आणि बाजूला ठेवून द्या.