युरिक अॅसिडची समस्या असल्यास गोड पदार्थ खाणे ठरेल धोकादायक
आजकाल, अस्वस्थ जीवनशैलीमुळे, बहुतेक लोक लहान वयातच गंभीर आजारांना बळी पडत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना युरिक अॅसिडची समस्या भेडसावत आहे. विशेषतः हिवाळ्यात युरिक अॅसिडची समस्या वाढते. या ऋतूत गुडघे, पायांची हाडे, कंबर आणि मनगटांमध्ये वेदना वाढतात.
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी औषधांसोबत योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या काळात बहुतेक लोक जास्त कॅलरीज आणि जड पदार्थ खातात. ज्यामुळे युरिक अॅसिडची समस्या वाढते. हिवाळ्यात कोणत्या पदार्थाचे सेवन केल्याने युरिक अॅसिड वाढते ते जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी कोणता गोड पदार्थ खाऊ नये याचे विश्लेषण दिले आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
युरिक अॅसिड म्हणजे काय
युरिक अॅसिड वाढते म्हणजे नक्की काय होते
शरीरात प्युरिनचे प्रमाण वाढले की युरिक अॅसिडची समस्या उद्भवते. जेव्हा शरीरात प्युरिनचे प्रमाण जास्त असते तेव्हा शरीरात क्रिस्टल्स जमा होऊ लागतात ज्यामुळे गाउटची समस्या वाढू शकते. युरिक अॅसिडच्या रुग्णांना कमी प्युरिन असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. युरिक अॅसिड असलेल्या रुग्णांसाठी काही पदार्थ हे विषापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे कोणते पदार्थ खाऊ नयेत हे समजून घेणं अधिक गरजेचे आहे
शरीरात झपाट्याने वाढलेले युरीक अॅसिड 5 पद्धतीने झर्रकन करा कमी
नॉर्मल पातळी किती असावी
युरिक अॅसिडची सामान्य पातळी ३.५ ते ७.२ एमजी/डीएल दरम्यान असावी. जेव्हा युरिक अॅसिड वाढते तेव्हा शरीरात खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत, तुम्ही औषधांसोबतच निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. ही पातळी ओलांडल्यानंतर सांधेदुखी आणि अन्य त्रास सुरू होतात आणि तुम्हाला ते आवरणेही कठीण होते
गरमागरम गुलाबजाम
गरम गुलाबजाम खाणे ठरेल धोकादायक
हिवाळ्यात गरमागरम गुलाब जामुन खायला सर्वांनाच आवडते, पण तुम्हाला माहिती आहे का की गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे युरिक अॅसिड वाढू शकते. खरं तर, साखर आणि फ्रुक्टोज सिरपचा वापर मिठाईंमध्ये केला जातो, ज्यामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला युरिक अॅसिडची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहारातून गोड पदार्थ कमी करू शकता. त्यामुळे केवळ हिवाळाच नाही तर उन्हाळ्यातदेखील गरमागरम गुलाबजाम खाणे तुम्हाला युरिक अॅसिडच्या समस्येसाठी त्रासदायक ठरू शकते
‘ही’ तीन पानं रक्तात जमलेलं युरीक ॲसिड काढतात बाहेर, रोज चावून करा सेवन
कसे कराल नियंत्रित
जर तुम्हाला युरिक अॅसिडची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. तसेच, तुमच्या आहारात शक्य तितके पाणी वापरा. जास्त पाणी पिऊन युरिक अॅसिड नियंत्रित करता येते. याशिवाय युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी फायबरचे सेवन करावे. फायबरसाठी, तुम्ही तुमच्या आहारात भरड धान्य आणि फळे आणि भाज्यांचा समावेश करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.