सकाळी उठल्यानंतर लघवीचा रंग पिवळा दिसेल असेल तर सावधान! शरीरसंबंधित दिसून येतात 'या' गंभीर आजाराचे संकेत
बऱ्याचदा सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा तुम्ही पहिले असेल, लघवीचा रंग गडद पिवळा दिसू लागतो. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, पाण्याचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरासंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर लघवीचा रंग अतिशय गडद पिवळा दिसतो. लघवीच्या रंगात होणारा बदल अनेकांना अतिशय सामान्य वाटतो, मात्र ही लक्षणे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचे संकेत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर वारंवार लघवीचा रंग पिवळा दिसत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर लघवीचा पिवळा रंग आरोग्यासंबंधित कोणत्या आजारांचे लक्षणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेल्या जंतामुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
सकाळच्या वेळी लघवीचा रंग पिवळा यूरोक्रोम नावाच्या एका पिगमेंटमुळे होतो. हे पिगमेंट तेव्हा शरीरात तयार होते, तेव्हा शरीरात हीमोग्लोबिन तुटते. या कारणामुळे लघवीचा रंग पिवळा होऊन जातो. वारंवार लघवीचा रंग पिवळा दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे लघवीचा रंग गडद दिसू लागतो. याशिवाय लघवी करताना वेदना होणे किंवा जळजळ वाढण्याची शक्यता असते. संपूर्ण दिवसभरात पाणी न प्यायल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर लघवीला घट्ट होते आणि यूरोक्रोमचे प्रमाण जास्त दिसते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
शरीरासाठी सर्वच विटामिन अतिशय महत्वाचे आहेत. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्याला हानी पोहचते. शरीरात निर्माण झालेल्या विटामिनच्या कमतरतेमुळे लघवीचा रंग अतिशय पिवळा दिसू लागतो.
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे लघवीद्वारे विषारी घटक बाहेर पडू लागतात. त्यामुळे लघवीचा रंग अतिशय गडद पिवळा दिसू लागतो.
लघवी पिवळी होण्याची कारणे?
जेव्हा शरीर पुरेसे पाणी हरवते, तेव्हा लघवी गडद पिवळी होते, कारण त्यामध्ये युरोक्रोम नावाचे रंगद्रव्य जास्त प्रमाणात जमा होते. बीट, गाजर किंवा विशिष्ट औषधे घेतल्यास लघवीचा रंग बदलू शकतो.
लघवी साफ होण्यासाठी काही घरगुती उपाय?
पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि लघवी साफ होण्यास मदत होते. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि लघवी साफ करण्यास मदत करतात.
लाल लघवी होण्याची काही सामान्य कारणे?
मूत्रमार्गाचा संसर्ग, मूत्रपिंड किंवा मूत्राशयात खडे, काही औषधे, जास्त व्यायाम, किंवा काही गंभीर वैद्यकीय स्थितींचा समावेश आहे.