Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हा Creative, व्हा ऍक्टिव्ह! शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळाची अनोखी सजावट

शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता मंडळ यंदा "व्हा Creative, व्हा Active" या अनोख्या संकल्पनेतून Left Brain Therapyचा संदेश देत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 29, 2025 | 06:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण काही ना काही तणावाला सामोरा जात आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही अभ्यासाचा बोजा, स्पर्धा, मोबाईलचा अतिरेक यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळ यंदा आपल्या गणपती सजावटीत “व्हा Creative, व्हा Active” ही वेगळी संकल्पना घेऊन आले आहे. ही सजावट संकल्पना डॉ. सुमित पाटील यांची असून ती Left Brain Therapy वर आधारित आहे. डाव्या मेंदूचा भाग म्हणजे विचारशक्ती, युक्तिवाद, भाषा, अनुशासन, गणित, क्रमबद्धता या गोष्टींशी संबंधित आहे. या थेरपीद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. विस्कळीत विचार, चिंता किंवा निर्णयक्षमतेतील अडचणी यावर या पद्धतीचा उपयोग होतो.

Egg Freezing कडे महिलावर्गाचा वाढता कल, काय आहेत कारणं; तज्ज्ञांकडून खुलासा

सजावटीत मुलांना व प्रौढांना सहभागी करणाऱ्या अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज ठेवण्यात आल्या आहेत. उदा. शब्दकोड्यातून गणपतीची नावे शोधणे, ठराविक रंगसंगतीनुसार रंग लावणे, वेगवेगळे आकार जोडून तयार झालेल्या चित्रांचा अर्थ लावणे. एका चौकोनी पॅनेलमध्ये ससा, माकड, पक्षी, झाड, घर अशा अनेक आकृत्या दिसतात. त्या पाहून गोष्ट किंवा कविता तयार करण्याचे आव्हान दिले जाते. या उपक्रमांमधून भाषिक व संज्ञानात्मक विकासाला चालना मिळते.

या सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला असून दिव्यांगांसाठी रॅम्प व ब्रेल लिपीची सोय ठेवण्यात आली आहे. रंगीत, आकर्षक चित्रांमुळे लहान मुले मोबाईलपासून दूर राहून येथे वेळ घालवतील आणि त्यांच्या मेंदूचा विकास खेळता-खेळता होईल.

खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका

मंडळ फक्त सजावटीपुरतेच मर्यादित राहत नाही, तर सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेते. दरवर्षी येथे येणाऱ्या गरजू भाविकांना व विमुक्त जातीतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. तसेच गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत केईएम आणि टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण व नातेवाईकांना मोफत नाश्ता दिला जातो. बुद्धी आणि शक्तीचा देवता असलेल्या गणरायाला साद घालत मंडळाचे घोषवाक्य यंदा खास आहे – “व्हा Creative, व्हा Active.” या अनोख्या सजावटीतून Left Brain Therapyचे महत्त्व अनुभवण्यासाठी गणेशभक्तांनी नक्कीच शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता मंडळाला भेट द्यावी.

Web Title: Be creative be active shivaji parks vighnaharta ganesh mandals unique decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 06:16 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2025: गोडधोडावर तुटून पडा, पण हृदयाच्या आरोग्याकडे करु नका दुर्लक्ष; तज्ज्ञांचा इशारा
1

Ganesh Chaturthi 2025: गोडधोडावर तुटून पडा, पण हृदयाच्या आरोग्याकडे करु नका दुर्लक्ष; तज्ज्ञांचा इशारा

वरुण धवनने घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन, पंडालबाहेर चाहत्यांची जमली गर्दी; पाहा व्हिडीओ
2

वरुण धवनने घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन, पंडालबाहेर चाहत्यांची जमली गर्दी; पाहा व्हिडीओ

Ganesh Chaturthi 2025: अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत
3

Ganesh Chaturthi 2025: अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत

Ganesh Chaturthi 2025 :  गणपतीला बाप्पा का म्हणतात? मूळ शब्द आला कुठून; 99% लोकांना माहीतच नाही
4

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला बाप्पा का म्हणतात? मूळ शब्द आला कुठून; 99% लोकांना माहीतच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.