खोबरेल तेल लावण्याचे फायदे
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड आणि स्वस्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. या प्रॉडक्टचा वापर त्वचेची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी केला जातो. पण काहीवेळा हेच प्रॉडक्ट त्वचेच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. अनेक महिला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात, पण यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते. केमिकल युक्त प्रॉडक्ट सतत वापरल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा? खोबरेल तेल त्वचेच्या आरोग्यासाठी खरच चांगले आहे का? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नक्की वाचा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केस कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा कापूरचा वापर, केस होतील मऊ
त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. खोबरेल तेल त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी मदत होते. तेलात असलेल्या लॉरिक असिड आणि फॅटी असिडमुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे, अशांनी नियमित त्वचेवर एक ते दोन थेंब खोबरेल तेल लावल्यास त्वचेमधील नैसर्गिक तेल टिकून राहील. त्वचा जास्त कोरडी दिसणार नाही. रोज हलक्या हाताने त्वचेवर खोबरेल तेल लावून मसाज करावा. मसाज केल्यामुळे चेहऱ्याचे रक्तभिसरण सुरळीत होऊन त्वचेची गुणवत्ता सुधारेल.
खोबरेल तेल लावण्याचे फायदे
खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मां आढळून येतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. तुमच्या त्वचेवर जर सतत मुरूम किंवा पुरळ येत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होण्यास मदत होईल. खोबरेल तेलामुळे त्वचेमधील जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन जातात.
हे देखील वाचा: गुडघे आणि हातांचे कोपरे काळे झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून घालवा काळेपणा
तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी चुकूनही त्वचेवर खोबरेल किंवा इतर तेल लावू नये. यामुळे तुमची त्वचा आणखीन तेलकट होऊ शकते. तेलकट त्वचा झाल्यामुळे नाकाच्या कोपऱ्यात आणि ओठांच्या खाली पुरळ किंवा मुरूम येऊ शकतात. त्वचेमधील तेल आणि इतर तेल त्वचेमध्ये मिक्स झाल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या आणखीन वाढू लागतात. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावू नये.