
केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी 'या' पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये केसांच्या समस्या झपाट्याने वाढू लागल्या आहेत. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे, केस कोरडे होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये केसात खूप जास्त कोंडा होऊन टाळूवर त्वचा कोरडी पडते. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे केस खूप जास्त गळतात. याशिवाय केसांना व्यवस्थित सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे केसांचे आरोग्य बिघडून जाते. अशावेळी कोणत्याही महागड्या केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला लिंबाच्या रसाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
लिंबाचा संपूर्ण शरीराला फायदा होतील. जेवण बनवताना लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. हानिकारक विषाणूंपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करावा. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. बऱ्याचदा शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर डॉक्टरसुद्धा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. आरोग्यासोबतच लिंबू केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे.
लिंबाच्या रसात खूप जास्त विटामिन सी असते. यामुळे डोक्यातील कोलेजनची निर्मिती वाढवून केसांचे आरोग्य कायमच निरोगी राहते. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आमि फ्लानोएड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. यामुळे तुम्ही लिंबाचा रस केसांच्या मूळांवर लावू शकता. केसांना लिंबू कधीही थेट लावू नये. खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून नंतरच केसांवर लावावा.
Lifestyle Tips: कोर्टिसोलमुळे वाढतोय ताण! काय आहे हा अनोखा घटक? जाणून घ्या
तुमचे केस खूप जास्त तेलकट असतील तर आठवड्यातून एकदाच लिंबाच्या रसात खोबऱ्याचे तेल मिक्स करून केसांवर लावावे. त्यानंतर दोन ते तीन मिनिटं हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर काहीवेळ केस तसेच ठेवा. १० मिनिटं झाल्यानंतर केस शॅम्पूच्या सहाय्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांवर लिंबाचा रस लावल्यास टाळूवरील त्वचा स्वच्छ होईल.केसांच्या मुळांवर कोणताही घरगुती पदार्थ लावताना पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. कारण ऍलर्जी किंवा टाळूवर खाज उठण्याची शक्यता असते. यासोबतच लिंबाचा रस कधीही केसांवर थेट लावू नये. कोणत्याही पदार्थामध्ये लिंबाचा रस मिक्स करून केसांवर लावावा. यामुळे केसांचे नुकसान होणार नाही.