
रोगप्रतिकारकशक्ती वाढते
रोजच्या धावपळीच्या जीवनात रोगप्रतिकारक शक्ती टिकवणं कठीण झालं आहे. त्यामुळे वातावरणातील बदल झाले की शरीर त्याला पटकन स्विकारत नाही, म्हणूनच अनेकजण वातावरण बदलामुळे आजारी पडतात. जर तुमची ही रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असेल तर रोज सकाळी तुळशीच्या पानांचा रस काढून ते पाण्याचं सेवन करा. अशाने सर्दी, खोकला आणि ताप या सारख्या व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होणार नाही. सर्दी आणि खोकल्याचा आजारावर आयुर्वे्दात तुळशीचा काढा पिणं म्हणजे रामबाण उपाय म्हटला जातो.
पचनसंस्था सुधारते
तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. आतड्यांचा चिकटलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास यामुळे मदत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं, पोट फुगणं किंवा गरम पडणं .या व्याधींवर संजिवनीसारखं काम तुळशीचं पाणी करतं.
यकृत आणि मुत्राशयाचे आरोग्य सुधारते
फील्ड वर्क किंवा प्रवासात असल्याने अनेकदा लघवी रोखून ठेवणं किंवा पाणी कमी पिणं होतं. मात्र यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यास अडथळे निर्माण होतात आणि मुत्राशयावर याचा गंभीर परिणाम होतो. लघवी व्यवस्थित न झाल्याने क्षारांच प्रमाण वाढतं त्यामुळे युटीआय सारखे आजार होतात. या समस्या तुम्हालाही सतत जाणवत असतील तर तुळशीचं पाणी यावर उत्तम उपाय आहे. तुळशीच्या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी रोज सकाळी तुळशीचं पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. मुत्रपिंड स्वच्छ राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेसाठी देखील याचा फायदा चांगला होतो. तुम्ही ऑफिसला जाताना तुमच्या बॉटलमध्ये पाच ते सहा तुळशीची पानं टाकून पाणी प्यायलात तरी याचा फायदा होतो.